India vs England : 'हे' 5 फलंदाज ज्यांच्यामुळे चौथा कसोटी सामना गमावला! काय झाल्या चुका? घ्या जाणून
India vs England 3rd Test Match Analysis : भारत आणि इंग्लड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना हातातोंडाशी आला पण शेवटी टीम इंडियाच्या शिलेदारांनी तो गमावला. रविंद्र जडेजाने एकहाती किल्ला लढवत भारताला विजयाकडे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला कुणाचीच साथ लाभली नाही. के.एल. राहुलनेच थोडी काय ती धावांची भर घातली. भारत आता या मालिकेत दोन विरुद्ध एक अशा पिछाडीवर आहे. भारताची आशा आता चौथ्या कसोटीवर आहे.

लाॅर्ड्स येथे रंगलेला कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ३८७ धावा केल्या त्यानंतर तेवढ्याच धावा आपल्या पहिल्या डावात टीम इंडियानेही केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडचा दुसरा डाव स्वस्तात गुंडाळला. तर भारताला फक्त १९२ धावांचेच आव्हान होते. पण तिसऱ्या दिवशी आपल्या चार दिग्गज फलंदाजांनी विकेट फेकल्या. चौथ्या दिवशीही रविंद्र जडेजा आणि केएल राहुल वगळता एकही फलंदाज टिकाव धरु शकला नाही.
फलंदाजांच्या अपयशामुळे भारत या कसोटी सामन्यात २२ धावांनी पराभूत झाला. भारताच्या पराभवासाठी हे पाच खेळाडू आधी जबाबदार आहेत असे क्रीडा रसिक म्हणत आहेत. जाणून घेऊया कुणी काय चूक केली ते..
१. यशस्वी जयस्वाल
भारताचा स्टार क्रिकेटर यशस्वी जयस्वाल आपल्या दुसऱ्या डावात अयशस्वी झाला. तो शुन्यावर बाद झाला त्याला किमान २० ते २५ धावा तरी काढता आल्या असत्या, पण त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर खराब शाॅट खेळला आणि कॅच ऑऊट झाला.
२. नितीश रेड्डी
मुळातः नितीश रेड्डी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पण नाईटवाॅचमन आकाशदीपला लवकर फलंदाजीला पाठवल्यामुळे नितीश रेड्डी थेट तळाचा फलंदाज म्हणून फलंदाजीसाठी आला, त्याने फारसा प्रभाव टाकला नाही आणि तो खराब शाॅर्ट खेळून कॅच देऊन बसला.
३. करुण नायर
करुन नायर याला खूप दिवसांनी कसोटी खेळण्याची संधी मिळाली. या कसोटीत त्याची खरी कसोटी लागली पण त्याला संधीचे सोने करता आले नाही. त्याने पहिल्या डावात ४० धावा केल्या पण दुसऱ्या डावात फक्त १४ धावा तो काढून बाद झाला.
४. केएल राहूल
केएल राहूल पहिल्या डावात जबरदस्त शतक झळकावले पण हीच लय त्याला दुसऱ्या डावात राखता आली नाही. खराब शाॅर्ट खेळून त्याने या डावात चमकण्याची संधी गमावली.
५. शुभमन गिल
कर्णधार शुभमन गिलवर सर्वाधिक जबाबदारी होती, एकतर कर्णधार आणि चांगल्या लयीत हा खेळाडू आहे पण त्याने फिल्ड सेटींगमध्ये चुका केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने बेजबाबदारपणे खेळ केला आणि आऊट झाला.












Click it and Unblock the Notifications