Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs ENG 3rd T20: इंग्लंडसाठी 'करा या मरो' स्थिती, राजकोट टी-20 खेळपट्टी, हवामान अहवाल

IND vs ENG Pitch and Weather: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी-20 सामना होणार आहे. विजयी मालिका कायम ठेवण्याच्या उद्देशाने कर्णधार सुर्यकूमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया राजकोटमध्ये मैदानावर उतरेल. टीम इंडियाला हा सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका जिंकायची आहे. दुसरीकडे इंग्लंडचे लक्ष्य कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणे आणि मालिकेत स्वतःला टिकवून ठेवणे असेल.

भारतीय संघाने कोलकाता आणि चेन्नईमध्ये टी-20 चे दोन्ही सामने जिंकले आहेत. आज भारतीय संघ राजकोटमध्ये कोणतीही चूक न करण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडचा संघ आता 'करो या मरो' अशा परिस्थितीत आहे. जर इंग्लिश संघ हा सामना गमावला तर मालिका गमावली जाईल.

IND vs ENG 3rd T20

राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियम धावांसाठी प्रसिध्द आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करते आणि गोलंदाजांसाठी समस्या निर्माण करते. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळू शकते. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या 189 आहे आणि तितकीच धावसंख्या अपेक्षित आहे.

हवामानाचा विचार केला तर कोणतीही समस्या नाही. हवामान स्वच्छ असेल. मंगळवारी वातावरण सूर्यप्रकाशित आणि थोडे उबदार असेल. संध्याकाळी खेळण्यासाठी हवामान चांगले असेल आणि पावसाची शक्यता नाही. संध्याकाळाच्या वेळेत काही प्रमाणात दव येऊ शकते.

भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये कोण पुढे ?

इंग्लंड आणि भारत यांच्यात टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडिया पुढे आहे. भारतीय संघाने 15 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे इंग्लिश संघाने 11 सामने जिंकले आहेत. राजकोट टी-20 हा सामना पाहुण्या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.

IND vs ENG T-20 प्लेइंग इलेव्हनची घोषणा: राजकोटमधील सामन्याच्या एक दिवस आधी इंग्लिश संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली गेल्या सामन्यात खेळलेला संघच मैदानात उतरेल. संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+