Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इंग्लंडनंतर भारताचा पुढील सामना या धोकादायक संघासोबत असेल, जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर

Champions trophy 2025 : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने टी-20 मालिका 4-1 ने तर एकदिवसीय मालिकेत 3-0 इंग्लंडचा पराभव केला आहे. आता चाहते रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या पुढील सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारताचा पुढचा सामना कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध आहे ते जाणून घेऊया.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आठ वर्षांनी पुनरागमन करत आहे. पाकिस्तान संघाकडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील अव्वल आठ संघांचा सहभाग असणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत 19 दिवस चालणार आहे.

Team India

या स्पर्धेतील संघांना दोन गटात विभागण्यात आलं आहे. गट अ मध्ये पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड संघाचा समावेश आहे, तर गट ब मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेश आहे.

पाकिस्तान 15 सामन्यांपैकी 9 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आयोजित करेल. यामध्ये कराची राष्ट्रीय स्टेडियम, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमचा समावेश असणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने युएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होतील. जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली तर हा सामना ही दुबईमध्येही होणार आहे.

इंग्लंडनंतर टीम इंडियाचा पुढील सामना या संघासोबत असणार

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत शानदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा पुढील सामना आता 20 फेब्रुवारी रोजी पाहायला मिळेल. भारत विरुध्द बांगलादेश असा पहिला पहिला सामना असणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता (09:00 GMT) खेळला जाईल.

भारत-पाकिस्तान सामना कधी आहे?

संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरा सामना हा भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना २३ फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता (09:00 GMT) दुबई येथे होणार आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता (09:00 GMT) पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड या सामन्याने सुरु होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

रिझर्व्ह : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+