कर्णधार बुमराहच्या नेतृत्वाखाली पर्थमध्ये भारताचा मोठा विजय, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 1-0 ने आघाडी
IND vs AUS Perth Test : पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी दणदणीत पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी 534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला. ऑप्टन स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाचे बालेकिल्ला आहे. तिथे त्यांना घरच्या मैदानावर पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन संघासाठी ट्रॅव्हिस हेडने आपल्या बॅटने दमदार कामगिरी करत वेगवान धावा केल्या. परंतु ट्रॅव्हिस हेड वगळता इतर फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दबाव सहन करता आला नाही. ट्रॅव्हिस हेडच्या 89 धावांची खेळी झाली. त्यासोबतच मिचेल मार्शनेही 47 धावांची खेळी खेळली. नंतर ॲलेक्स कॅरी मैदानावर थांबला पण 36 धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात 238 धावांवर बाद झाला. भारत 295 धावांनी विजयी मिळवला असून परदेशातील हा त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. बुमराह हा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या नव्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आतापर्यंत अपराजित होता.
जसप्रीत बुमराहने आपल्या कर्णधारपदाने केवळ छाप पाडली नाही तर संघासाठी चमकदार गोलंदाजीही केली. पहिल्या डावात 5 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला होता. यानंतर बुमराहने दुसऱ्या डावात एकूण 3 बळी घेतले. सिराजलाही 3 बळी मिळाले. हर्षित राणाने 2 आणि नितीश रेड्डीने 1 बळी घेतला.पहिल्या डावातील खराब फलंदाजीनंतर टीम इंडियाने या कसोटी सामन्यात पुनरागमन केले. पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर बाद झाली होती. गोलंदाजांनी धमाकेदार पुनरागमन करत कांगारूंना 104 धावांवर बाद केले.
यानंतर दुसऱ्या डावात कोहली आणि जैस्वाल यांनी टीम इंडियासाठी शतके झळकावली आणि भारताचा डाव 6 बाद 487 धावांवर घोषित करण्यात आला. जयस्वालच्या बॅटमधून 161 धावा झाल्या. कोहलीने 100 धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.












Click it and Unblock the Notifications