T20 World Cup: 'हा' विक्रम करणारा इंग्लंडनंतर भारत ठरला दुसरा देश
Mumbai: 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी मालिका सुरूच आहे. टीम इंडियाने गुरुवारी अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा या सीजनमधील हा चौथा विजय ठरला. गुरुवारी भारताच्या 181 धावांना प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानचा डाव 134 धावांवर आटोपला.
राशिद खानच्या संघाविरुद्धच्या या विजयासह भारतीय संघानेही विशेष कामगिरी केली. एवढेच नाही तर रोहित शर्माची टीम 2022 मध्ये बनवलेला विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

अफगाणिस्ताने सर्व खेळाडू झेलबाद झाले. टी-20 विश्वचषकात एखाद्या संघाच्या 10 विकेट झेलबादांच्या रूपात पडण्याची ही दुसरी वेळ आहे. अफगाणिस्तानविरुद्धही हे प्रथमच घडले.
2022 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडने अफगाणिस्तानच्या सर्व 10 खेळाडूंना झेलबाद करून पर्थमध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. आता अशी कामगिरी करणारा भारत हा इंग्लंडनंतरचा दुसरा संघ ठरला आहे.
डिसेंबर 2023 पासून भारताची ही विजयी मालिका सुरू आहे. T20 आंतरराष्ट्रीय मध्ये, भारतीय संघाने नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान सलग सर्वाधिक सामने जिंकले आहेत. या काळात टीम इंडियाने सलग 12 टी-20 सामने जिंकले होते.
त्याच वेळी, जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान, भारतीय संघाने सलग नऊ T20 सामने जिंकले होते. रोहित शर्माने पुढील दोन सामने जिंकल्यास तो नऊ सामने मागे सोडेल. यासोबतच जर भारतीय संघ अंतिम फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर सलग 12 सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी होईल.
बुमराह आणि अर्शदीपचा भेदक मारा
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने T20 विश्वचषकात सलग चौथा विजय नोंदवला. भारताने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत सुपर एट टप्प्यातील सामना जिंकला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. सूर्याने 28 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. याशिवाय हार्दिक पांड्याने 24 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या.

प्रत्युत्तरात बुमराह आणि अर्शदीपने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, ज्याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 20 षटकांत 134 धावांत गुंडाळले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईने 20 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 26 धावा केल्या.
भारताचा पुढील सामना बांगलादेशसोबत होणार आहे. या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. कारण बांगलादेश आणि भारतातील सामना हा नेहमी अटीतटीचा होता असतो.












Click it and Unblock the Notifications