Independence Day: क्रिकेट पासून हाॅकीपर्यंत, स्वांतत्र्यानंतर किती बदलले भारतीय क्रिडा विश्व? वाचा
Independence Day Special: स्वातंत्र्यानंतर खेळांचा भारतातील प्रवास गौरवशाली राहिला आहे. भारत आपला 78वा स्वांतत्र्यदिन साजरा करण्यास सज्ज आहे.
भारताने स्वतंत्र झाल्यापासून ते आतापर्यंत खेळाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक मोठ्या कामगि-या मिळवल्या आहेत. |ऑलंपिकमधील पदकांपासून क्रिकेट आणि हाॅकीपर्यंत भारतीय खेळाडूंची खूप चांगली कामगिरी राहिली आहे.

हाॅकीत मिळाले सुवर्णपदक
1940 च्या दशकाच्या अखेरीस भारताने 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनला हरवून हाॅकीमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. हा विजय यासाठी महत्वाचा होता की, विभाजनानंतर राष्ट्रीय उलथापालथीच्या काळात तो मिळाला होता. या विजयामुळे देशाला खूप मोठा गौरव प्राप्त झाला.
मिल्खा सिंग यांनी बदलवला दृष्टिकोन
1950 च्या दशकात भारताची क्रीडा प्रतिभा दिसून आली. ज्यामध्ये मिल्खा सिंग एक स्टार म्हणून उदयास आले. मात्र, रोममध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्यापासून त्यांची संधी हुकली, पण त्यांनी 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याशिवाय 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकून फुटबॉलची उपांत्य फेरी गाठली होती. 1952 मध्ये भारताने चेन्नई येथे पहिला कसोटी सामना जिंकला आणि जल्लोष केला.
1960 दरम्यान खेळांचा विस्तार
1960 च्या दशकात भारताने क्रीडा क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवली. मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1968 मध्ये पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकली. भारतीय फुटबॉल संघाने 1962 मध्ये जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. 1964 च्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवून हॉकीने आपली चमक कायम ठेवली.
70 नंतर क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात
अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेटच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली. टीम इंडियाने 1971 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. याच काळात सुनील गावसकर क्रिकेट स्टार म्हणून उदयास आले.
1970 ते 1980 हा काळ भारतीय खेळांसाठी संमिश्र होता. 1974 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डेव्हिस कप फायनलवर भारताने रंगभेद धोरणामुळे बहिष्कार टाकला होता. टेनिस स्टार विजय अमृतराजने विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली, ही एक महत्त्वाची कामगिरी होती.
कपिल देव यांनी जिंकला पहिला विश्वचषक
1983 हे वर्ष भारतीय क्रीडाप्रेमींसाठी संस्मरणीय ठरले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला. हा विजय आजही देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण म्हणून साजरा केला जातो. 1990 च्या दशकानत उत्सव साजरा करण्यासाठी आणखी कारणे आली.
जेव्हा 1996 मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेसने कांस्यपदक जिंकले आणि महेश भूपतीने टेनिसमध्ये दमदार कामगिरी केली. जगमोहन दालमिया आयसीसीचे अध्यक्ष झाले, ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा प्रभाव वाढला.
क्रिकेटमध्ये वाढला भारताचा दबदबा
2007 आणि 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने वानखेडे स्टेडियमवर पुन्हा विश्वचषक जिंकून आपल्या क्रिकेट इतिहासात आणखी एक गौरवशाली अध्याय जोडला. याशिवाय 2024 रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषक जिकंला. क्रिकेट शिवाय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनू भाकर आणि नीरच चोप्राने कमाल केली. नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. याआधीही टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये नीरज ने सुवर्णपदक जिंकले होते.












Click it and Unblock the Notifications