Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs SA Final : वर्ल्ड कपचा फायनल सामना, केवळ भारताच नाही तर जगाचं लक्ष

Ind Vs SA Final : क्रिकेट प्रेमींसाठी आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. 29 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे हा सामना होणार आहे.

Ind Vs SA Final Mach

या सामन्याकडे केवळ भारताच नाही तर जगाचं लक्ष आहे. भारतीय संघाने हा वर्ल्डकप जिंकावा, यासाठी क्रिकेटप्रेमी त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. भारतात ठिक-ठिकाणी देवाला साकडं घातलं जात आहे. भारतातील शहराशहरात, गावागावात क्रिकेटचा फिवर पाहायला मिळतोय. कुठे भारताच्या विजयासाठी आरती, पूजा केली जातेय. कुणी विजयासाठी देवाला साकडं घातलं आहे.

बार्बाडोस येथे होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ICC T20 विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेट चाहते भारतीय संघाच्या खेळाडूंचे हातात पोस्टर घेऊन टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. प्रयागराजमध्ये लोकं संगमावर 'आरती' करत आहेत. उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक दीनदयाल मिश्रा यांनी भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे मला आशा आहे की भारत जिंकेल." अशी प्रतिक्रीया दिली आहे.

टीम इंडिया विश्वचषकाचे जेतेपद पटकावणार-मॉन्टी पानेसर

या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मॉन्टी पानेसरने मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडिया विश्वचषकाचे जेतेपद पटकावणार असून कोहली फायनलमध्ये शतक करेल, असे त्याने सांगितले आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना माजी इंग्लिश फिरकीपटू म्हणाला, "भारत टी20 विश्वचषक 2024 ची फायनल जिंकेल आणि विराट कोहली शतक झळकावेल." अशी भविष्यवाणी मॉन्टी पानेसरने याने केली आहे.

भारत-इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे विजेतेपदाच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, पण राखीव दिवशी पण पावसामुळे व्यत्यय आणला तर विजेता भारत ठरणार की दक्षिण आफ्रिका?

तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यासाठी आयसीसीने 30 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. सर्वप्रथम 29 जून रोजी होणारा सामना आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जर हा सामना 29 तारखेला होऊ शकला नाही, तर तो राखीव दिवशी खेळला जाईल. राखीव दिवशी, सामना 29 जून रोजी जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू होईल. पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे राखीव दिवशीही सामना खेळला गेला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+