Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK Final : जर आज पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण बनेल विजेता, जाणून घ्या संपूर्ण गणित!

IND vs PAK Asia Cup 2025 Final : आशिया कप २०२५ चा महाअंतिम सामना आज, रविवार, २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाईल. क्रिकेटप्रेमींच्या नजरा या हाय-व्होल्टेज सामन्याकडे लागल्या असताना, अशातच, अचानक मनात एक प्रश्न डोकावत आहे. जर आज रात्री पावसामुळे हा सामना वाया रद्द झाला तर कोणता संघ विजेता ठरेल? ट्रॉफी भारत जिंकेल की पाकिस्तान?, चला तर या विषयी जाणून घेऊया सर्व काही...नेमकं काय आहे गणित..!

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने भारताकडून साखळी फेरीत दोनदा पराभव पत्करला असला तरी, बाद फेरीत बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

India Pakistan final rain rule

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय?

क्रिकेटमध्ये पावसाचा व्यत्यय ही काही नवीन गोष्ट नाही, विशेषतः मोठ्या स्पर्धांमध्ये. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) या महत्त्वपूर्ण अंतिम सामन्यासाठी एक विशेष तरतूद केली आहे.

जर आज, २८ सप्टेंबर रोजी पावसामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना पूर्ण होऊ शकला नाही किंवा रद्द झाला, तर हा सामना सोमवार, २९ सप्टेंबर रोजी 'राखीव दिवशी' खेळवला जाईल. एसीसीने अंतिम सामन्यासाठी हा राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच, आज सामना पूर्ण न झाल्यास, चाहत्यांना दुसऱ्या दिवशीही हा रोमांचक सामना पाहता येईल.

राखीव दिवशीही पाऊस पडल्यास

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की, जर राखीव दिवशी, म्हणजेच २९ सप्टेंबर रोजीही पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर काय होईल? अशा परिस्थितीत, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना आशिया कप २०२५ चे 'संयुक्त विजेते' म्हणून घोषित केले जाईल. म्हणजेच, दोघांनाही ट्रॉफी वाटून दिली जाईल.

दुबईमधील आजचे हवामान कसे आहे?

सुदैवाने, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुबईतील हवामान सहसा उष्ण आणि कोरडे असते आणि सध्याच्या अंदाजानुसार, आज पावसाची कोणतीही शक्यता नाही. अंतिम सामन्याच्या दिवशी दुबईमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ आणि निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. वादळ किंवा पावसाची कोणतीही शक्यता नाही. दिवसा तापमान सुमारे ३९ अंश सेल्सिअस तर रात्री २९ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

याचा अर्थ, चाहत्यांना आज कोणताही व्यत्यय न येता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संपूर्ण सामना पाहण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता दुबईमध्ये हा सामना सुरू होईल आणि याचा निकाल आजच लागण्याची दाट शक्यता आहे. तरीही, क्रिकेटमध्ये हवामानाची अनिश्चितता नेहमीच असते. पण एसीसीने केलेल्या तरतुदींमुळे, चाहत्यांची निराशा होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. आता फक्त हा थरारक सामना कधी सुरू होतो आणि कोणता संघ आशिया कप २०२५ चा एकमेव विजेता बनतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+