Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ : न्युझीलंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना कधी कुठे? टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल

IND vs NZ : पुण्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ पुढील सामन्यात आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो यावर प्रश्नचिन्हच आहे. कारण दोन कसोटी सामन्यात भारताला करारी हार पत्करावी लागली. गेल्या दोन सामन्यात लाजीरवाण्या पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल असेही काहींना वाटते.

बंगळुरू आणि पुण्यातील पराभवामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. पुणे कसोटीदरम्यान काही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करूनही संघाचा 113 धावांनी पराभव झाला.

IND vs NZ When and where 3rd test match against New Zealand

कधी कुठे तिसरा कसोटी सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अंतिम कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सलग दोन पराभवानंतर भारतीय संघाने मालिका आधीच गमावली आहे. मात्र जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप टाळायचा आहे.

सरफराज खानचाही समावेश

पुढील सामन्यात होणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्फराज खान राहणार हे नक्की झाले आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याला संधी दिल्यानंतर संघ पुढील सामन्यात त्याला पुन्हा खेळवू शकतो. ध्रुव जुरेल अद्याप या मालिकेत दिसला नाही आणि त्याची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. अशा परिस्थितीत त्याला संधी दिली जाऊ शकते.

  • पुणे कसोटीत खेळणाऱ्या आकाश दीपला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जाऊ शकते.
  • वेगवान गोलंदाजी मजबूत करण्यासाठी मोहम्मद सिराज आकाश दीपची जागा घेऊ शकतो.
  • सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात आहे, त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात त्याला पुन्हा लय सापडू शकते.
  • मुंबईत मोहम्मद सिराज आणि ध्रुव जुरेल यांच्या समावेशाचा भारताला फायदा होऊ शकतो.

अंतिम कसोटीत विजय हवाच

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अंतिम कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे.हा सामना जर भारताने गमावला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाची वाट खडतर होऊ शकते. तर दुसरीकडे आता भारतीय संघात तिसऱ्या कसोटीसाठी मोठे बदल होऊ शकतात जर असे बदल केले गेले नाही तर पु्न्हा किवीचा संघ भारतावर हावी होऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+