IND vs NZ: भारत - न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत दोन ICC फायनल झाले,जाणून घ्या कोणाचा पगडा भारी
IND vs NZ ICC Finals Head To Head: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड संघाशी होईल. बुधवारी 5 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून न्युझीलंड संघाने जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे. रचिन रवींद्र (108) आणि केन विल्यमसन (102) या शतकी खेळाच्या जोरावर किवीज संघाने 50 षटकांत सहा बाद 362 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत नऊ गडी गमावून फक्त 312 धावा करता आल्या.
भारतीय संघ 25 वर्षपुर्वीचा बदला घेणार ?
दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मोठा विजय मिळवल्यानंतर किवी संघ रविवार 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध गट अ सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे 2000 च्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या भारतीय संघ 25 वर्षे जुना न्यूझीलंड संघासोबतचा बदला घेईल.

भारताचा झाला होता पराभव हरला होता
15 ऑक्टोबर 2000 रोजी नैरोबीतील जिमखाना क्लब ग्राउंडवर 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला होता. किवी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर कर्णधार सौरव गांगुलीच्या 117 आणि सचिन तेंडुलकरच्या 69 धावांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 6 बाद 264 धावा केल्या.
पण न्युझीलंड संघाची सुरुवात खराब झाल्यानंतर ही त्यांनी 49.4 षटकांत सहा गडी गमावून 266 धावा करत सामना जिंकला होता. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केल्यानंतर अष्टपैलू ख्रिस केर्न्सने 113 चेंडूत 102 धावांची नाबाद खेळी केली. 132 धावांत 5 विकेट गमावल्यानंतर ख्रिस केर्न्सच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दोन चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. ही न्यूझीलंडची पहिली आयसीसी ट्रॉफी होती.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा पराभव
दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामाचा (2019-21) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 23 जून दरम्यान साउथहॅम्प्टनमधील द रोझ बाउल स्टेडियमवर खेळवण्यात आला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला 8 विकेट्सनी दारुण पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. काइल जेमीसनने 31 धावांत 5 बळी घेतले तर ट्रेंट बोल्ट आणि नील वॅग्नर यांनी प्रत्येकी दोन बळी घेत भारताला पहिल्या डावात फक्त 217 धावांत गुंडाळले. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या 54 आणि विल्यमसनच्या 49 धावा असूनही किवी संघ पहिल्या डावात केवळ 249 धावा करू शकला. परंतु दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज पुन्हा एकदा चांगली कामगिरी करू शकले नाहीत आणि 73 षटकांत 170 धावांवर सर्वबाद झाले.
सामन्याच्या चौथ्या डावात किवी संघाला 139 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते आणि विल्यमसनच्या नाबाद 52 आणि रॉस टेलरच्या 47 धावांच्या खेळीमुळे त्यांनी 45.5 षटकांत केवळ दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. अशाप्रकारे आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड दोन आयसीसी फायनलमध्ये एकमेकांसमोर आले आहेत आणि दोन्ही फायनलमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.












Click it and Unblock the Notifications