ind vs nz 1st TEST Match : भारतीय संघ पहिल्या डावात 46 धावांवर ऑल आऊट! न्युझीलंडची बॅटींग सुरु
ind vs nz 1st TEST Match : न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 46 धावांत ऑलआऊट झाला आहे. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात लहान धावसंख्या आहे. यापूर्वी 1987 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत टीम इंडिया 75 धावांत ऑलआऊट झाली होती.

अशी ढेपाळली टीम इंडिया
- भारताची पहिली विकेट 9 धावांवर रोहीत शर्माच्या रुपात पडली. त्यानंतर 9 धावांवरच विराट कोहली बाद झाला.
- सरफराज खान 10 धावा असतानाच बाद झाला म्हणजेच तीन फलंदाज दहा धावांच्या आत तंबूत परतले.
- यशस्वी जैस्वालच्या रुपात चौथी विकेट पडली. संघाच्या ज्यावेळी 31 धावा होत्या तेव्हा यशस्वी अयशस्वी झाला. दरम्यान यानंतर अवघ्या 15 धावात भारतीय संघाच्या सहा विकेट्स गेल्या.
- यशस्वी जैस्वालनंतर लोकेश राहूल 33 धावा असताना बाद झाला. यानंतर रविंद्र जडेजा संघाच्या 34 धावा असताना बाद झाला. दरम्यान, रविचंद्रन अश्वीलही लगेचच बाद झाला.
- त्यानंतर ऋषभ पंतने आपली विकेट सोडली आणि तो तंबूत परला.
- भारतीय संघाच्या 40 धावा असताना जसप्रित सिंह बुमराह बाद झाला तर कुलदीप यादवच्या रुपात भारतीय संघाची अखेरची विकेट पडली आणि टीम इंडिया अवघ्या 46 धावात ढेपाळली.
आठ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही
यशस्वी जैस्वाल याने संघासाठी 13 धावांचे योगदान दिले तर ऋषभ पंत याने 20 धावांचे योगदान दिले. यानंतर एकही भारतीय फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताची सर्वात कमी धावसंख्या
यापूर्वी, दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची सर्वात कमी कसोटी धावसंख्या होती. मायदेशातील कसोटीत भारताची सर्वात कमी धावसंख्या 46 आहे, तर परदेशातील कसोटीत भारताची सर्वात कमी धावसंख्या आणखी कमी आहे. 2020 मध्ये ॲडलेडमध्ये बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या कसोटीत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांत आटोपला होता, ही केवळ त्यांची परदेशातील कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या नाही तर एकूण कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे.
पहिल्या कसोटीत टीम इंडियाची खराब सुरुवात विल्यम ओ'रोर्क आणि मॅट हेन्री यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने विजय मिळवला बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 46 धावांत आटोपला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांनी सतत विकेट गमावल्या.












Click it and Unblock the Notifications