Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र कन्या स्मृती मानधनाने इंग्रजांना चारली धुळ! शेफालीसह रचला नवा विश्वविक्रम,T-ट्वेंटीत विजय

Ind vs eng women T20 : भारताच्या स्टार फलंदाज स्मृती मानधना ही पुन्हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात स्टार ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार कामगिरी करत ९७ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या जोडीने धावा तर केल्या पण एक नवा विश्वविक्रम केला.

भारत आणि इंग्लड यांच्यात टी-२० सामन्याची मालिका सुरु आहे. यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय खेळाडूंनी इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि स्मृतीने तडाखेबंद शतक ठोकत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

Ind vs eng women T20

स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक

कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या दुखापतीने ग्रस्त आहे. तिच्या जागी या टी-२० सामन्यात स्मृती मानधनाने संघाचे नैतृत्व केले. तिने या सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळी तर केलीच पण सामनाही आपल्या बाजूने फिरवला. आपल्या खेळीत तिने ६२ चेंडूत ११२ धावा केल्या. तिच्या डावात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला.

Take a Poll

स्मृती मानधना ठरली तिन्ही फाॅरमॅटमध्ये शतक ठोकणारी खेळाडू

स्मृती मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांमध्ये, कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-२० सामन्यात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे.

भारत आणि इंग्लड टी-२० सामन्याचे हायलाईट्स

  • प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ बाद २१० धावा केल्या, जो भारताचा दुसरा सर्वोच्च टी-२० धावसंख्या होता.
  • शेफालीसोबत विक्रमी भागीदारी स्मृती मानधना आणि शेफाली वर्माच्या जोडीने या सामन्यात ७७ धावांची सलामीची भागीदारी केली.
  • यानंतर इंग्लडचा संघ फलंदाजीला उतरला. कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट हिने ४२ चेंडूत तडाखेबंद ६६ धावा केल्या पण इतर कोणत्याही खेळाडूला साथ देऊ शकली नाही.
  • इंग्लडचा संपूर्ण संघ १४.५ षटकांत ११३ धावांवर गारद झाला. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात ४ वर्षांनंतर पुनरागमन करणारी श्री चरणीने टिच्चून गोलंदाजी केली.
  • श्री चरणीने भारतातर्फे चमकदार कामगिरी करत ४ बळी घेतले. तिने अवघ्या १२ धावांत ४ बळी घेणे ही कोणत्याही पदार्पण करणाऱ्या भारतीय महिला खेळाडूची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.

शेफाली- मानधनाचा 'हा' नवा विश्वविक्रम

शेफाली आणि मानधना यांनी फलंदाजीद्वारे खास भागीदारी केली. त्यांनी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २१ वेळा ५०+ धावांच्या भागीदारीचा नवा विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि बेथ मुनी यांच्या नावावर होता. हा विक्रम आता त्यांनी मोडला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+