IND vs ENG : 5 खेळाडूंच्या शतकांनंतरही पराभव! टीम इंडियाचं कुठं चुकलं? या 5 कारणांमुळे पराभव, वाचा
IND vs ENG Why did Team India lose in the first Test match : इंग्लडमध्ये लिड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लडने शानदार डावपेच आखतही कसोटी भारताच्या हातातून हिसकावून घेतली. चौथ्या दिवसांपर्यंत भारताची या कसोटी सामन्यावर पकड होती पण नंतर माशी शिंकली अन् भारत पराभूत झाला.
लीड्समध्ये झालेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना क्रिकेट इतिहासात नेहमीच लक्षात राहील. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली, तरीही हार पत्करावी लागली. भारतीय संघ एवढा अपयशी का ठरला याची कारण मिमांसा तर करावीच लागणार आज आपण या पराभवाची कारण मिमांसा पाच मुद्द्यांत समजून घेऊया.

1. सोडलेले झेल
पहिल्या आणि दुसऱ्या डावात भारताने एकूण पाच शतके ठोकली. पण असे असूनही, टीम इंडियाला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका संघाच्या ५ फलंदाजांनी शतके ठोकली आणि तरीही संघाचा पराभव झाला. या सामन्यादरम्यान भारताने अनेक महत्त्वाचे झेल सोडले. शतकापूर्वी जसस्वी जयस्वालने बेन डकेटचा झेल सोडला. याशिवाय, झॅक क्रॉलीलाही संधी मिळाली.
2. खराब क्षेत्ररक्षण
झेल तर सोडलेच पण क्षेत्ररक्षणही सुमार ठरले. यामुळे इंग्लंडला मोठ्या भागीदारी करण्याची संधी मिळाली. कोणताही सामना जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षणाची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे क्षेत्ररक्षण हे संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जाऊ शकते.
3. कर्णधार शुभमन गिलचे बचावात्मक धोरण
शुभमन गिल याने पहिल्याच कसोटीत कर्णधारपद भुषवले, या कसोटीत भारताला विजय मिळवायचा होता की, कसोटी सामना अनिर्णित ठेवायचा हेच समजले नाही नेमके डावपेचही स्पष्ट दिसून आलेले नाही. शुभमन गिलने पाचव्या दिवशी सुरुवातीपासूनच बचावात्मक क्षेत्ररक्षण केले. अनेक क्षेत्ररक्षणकर्ते सीमारेषेवर होते, ज्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना दबावाशिवाय धावा काढण्याची संधी मिळाली. जर थोडी आक्रमक कर्णधारपदी असती तर कदाचित सामन्याचा निकाल काहीसा वेगळा असू शकला असता.
4. गोलंदाजांची कामगिरी सुमार
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त, भारताचे इतर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी खूप निराश केले. ते ना स्विंग करू शकले, ना फलंदाजांवर दबाव आणू शकले. इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचेपर्यंत विकेटही खूप उशिरा आल्या. अशा परिस्थितीत, तिथून सामन्यात पुनरागमन करणे भारतासाठी खूप कठीण झाले. शुभमन गिलला मोठी समस्या भेडसावत होती चेंडू बदलण्याचा आग्रह धरण्यात वेळ वाया घालवणे पाचव्या दिवशी, भारतीय संघ वारंवार चेंडू बदलण्याची मागणी करत राहिला, ज्यामुळे खेळात व्यत्यय आला आणि लक्ष विचलित झाले. याचा फायदा इंग्लंडला झाला, ज्यांनी कोणताही त्रास न होता धावा काढत राहिल्या.
5. भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्या
भारताची पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात सुरुवात चांगली केली पहिल्या डावात तीन फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नंतर मात्र, सात विकेट स्वस्तात फेकल्या सात विकेट्सनी मिळुन तिहेरी धावसंख्याही भारतीय संघ काढू शकला नाही. दुसऱ्या डावातही पाच गडी बाद तिनशे पार धावसंख्या असताना शेवटच्या पाच विकेट्स अक्षरशः भारतीय फलंदाजांनी फेकल्या त्या अवघ्या पन्नास ते सत्तर धावांतच..












Click it and Unblock the Notifications