Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs Eng Test : लॉर्ड्सच्या मैदानावर रणकंदन; जडेजा-कार्समध्ये बाचाबाची,पाहा, थरारक VIDEO

Jadeja Vs Cars clash, Video Viral : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी आता केवळ क्रिकेटचा खेळ राहिली नसून, मैदानावर अक्षरशः युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामना निर्णायक वळणावर असताना खेळाडूंच्या मनातील तणाव मैदानावर स्पष्टपणे दिसून येत आहे, आणि याच तणावातून रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कार्स यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, अखेर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

Ind Vs Eng Test Match

जडेजा आणि कार्सचा मैदानावर लागला 'खांद्याला खांदा'

हा सर्व प्रकार इंग्लंडच्या डावातील 35 व्या षटकात घडला. ब्रायडन कार्स गोलंदाजी करत असताना, या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मैदानावर अचानक तणाव वाढला.

रवींद्र जडेजा आणि नितीश रेड्डी यांनी पहिल्या धावेसाठी वेग घेतला. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावताना, ब्रायडन कार्स थेट जडेजाच्या मार्गात उभा राहिला. दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात जडेजाचा खांदा कार्सला जोरदार आदळला. जडेजाने धाव पूर्ण केली खरी, पण त्यानंतर लगेचच तो कार्सच्या दिशेने वळला.

दुसऱ्या बाजूला, कार्सही मोठ्याने ओरडायला लागला, ज्याला जडेजानेही तितक्याच वेगाने प्रत्युत्तर दिले. मैदानावर अचानक निर्माण झालेला हा तणाव आणि दोघांमधील शाब्दिक युद्ध इतके वाढले.

शेवटी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला नाईलाजाने मध्यस्थी करावी लागली. स्टोक्सने दोन्ही खेळाडूंना शांत करत त्यांना एकमेकांपासून दूर केले आणि परिस्थिती अधिक बिघडण्यापासून वाचवली.

स्टोक्सचा नितीश रेड्डीला चिथावण्याचा प्रयत्न!

याच सामन्यादरम्यान, बेन स्टोक्सने केवळ जडेजा-कार्स यांच्यातील वादच मिटवला नाही, तर तो भारताचा युवा फलंदाज नितीश रेड्डी यालाही चिथावण्याचा प्रयत्न करताना दिसला. रेड्डी फलंदाजी करत असताना, स्टोक्सने त्याला काहीतरी बोलून विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीश रेड्डीनेही स्टोक्सच्या बोलण्याला शांतपणे पण सडेतोड उत्तर देत आपला संयम गमावला नाही.

निर्णायक टप्प्यावर लॉर्ड्स कसोटी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचक टप्प्यावर आहे. दुसऱ्या डावात भारतासमोर १९३ धावांचे लक्ष्य आहे. सध्या भारताने ८ विकेट गमावून ११२ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला आणखी ८१ धावांची गरज आहे, आणि त्यांच्याकडे केवळ दोन विकेट शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, खेळाडूंच्या मनातील तणाव आणि मैदानावर होणारे हे छोटे-मोठे वाद सामन्याला आणखी रोमांचक बनवत आहेत. आता लॉर्ड्सच्या मैदानावर कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+