IND vs ENG Semifinal: पाऊस ठरणार व्हिलन? 5चा सामना 6 मार्चला होणार का? जाणून घ्या नियम
IND vs ENG T20 World Cup 2026 : 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या, गुरुवारी (५ मार्च) मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ दुसऱ्या उपांत्य सामन्यात आमनेसामने येणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर विजय मिळवून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांच्या काळजीत वाढ झाली आहे.

पाऊस पडला तर सामना ६ मार्चला होणार का?
ICC ने बाद फेरीच्या (Knockout) सामन्यांसाठी अत्यंत कडक आणि स्पष्ट नियम आखले आहेत. जर गुरुवारी पावसामुळे खेळात व्यत्यय आला, तर खालील प्रक्रिया राबवली जाईल:
पहिली प्राथमिकता : पंचांचा पहिला प्रयत्न त्याच दिवशी (5 मार्च) सामना पूर्ण करण्याचा असेल. यासाठी अतिरिक्त 90 मिनिटे वेळ राखून ठेवण्यात आली आहे.
राखीव दिवस (Reserve Day) : जर गुरुवारी किमान 5 षटकांचा खेळ देखील शक्य झाला नाही, तर हा सामना शुक्रवारी, 6 मार्च रोजी खेळवला जाईल.
नियम : राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता, तिथूनच पुढे सुरू होईल. या दिवशी खेळासाठी अतिरिक्त 120 मिनिटे देण्यात आली आहेत.
सामना रद्द झाला तर भारताचे काय होणार?
क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे सामना पूर्णपणे रद्द झाला तर लागू होणारा नियम. जर मुसळधार पावसामुळे राखीव दिवशीही (६ मार्च) निकाल लागू शकला नाही, तर सुपर ८ पॉइंट्स टेबलच्या आधारे निर्णय घेतला जाईल.
इंग्लंडला मोठा फायदा
या नियमानुसार, सामना रद्द झाल्यास इंग्लंड अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. याचे कारण असे की, इंग्लंडने त्यांच्या सुपर 8 गटात तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले होते. याउलट, भारतीय संघाने दोन विजय मिळवून आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले होते. असाच नियम पहिल्या उपांत्य फेरीसाठी (दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड) लागू असेल. तिथे सामना रद्द झाल्यास अपराजित राहिलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये पोहोचेल.
भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा रंजक इतिहास
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतींचा इतिहास अत्यंत रंजक आहे. गेल्या दोन विश्वचषकांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास एक विशेष योगायोग दिसून येतो:
- वर्ष : निकाल परिणाम
- २०२२ : इंग्लंडने भारताला हरवले इंग्लंड विश्वविजेता बनला
- २०२४ : भारताने इंग्लंडला हरवले भारत विश्वविजेता बनला
विशेष म्हणजे, गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये या दोन्ही संघांपैकी जो संघ उपांत्य फेरीत जिंकला, त्यानेच विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे यंदाचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वानखेडेवर पावसाची कृपा राहणार?
भारतीय चाहत्यांसाठी वानखेडेचे मैदान नेहमीच लकी राहिले आहे. मात्र, पावसाच्या नियमांमुळे भारताचे पारडे सध्या थोडे जड वाटत असले तरी गुणतालिकेतील स्थानामुळे इंग्लंडला 'बॅकअप' फायदा आहे. आता भारतीय संघाला केवळ इंग्लंडच्या गोलंदाजीशीच नाही, तर निसर्गाशीही लढा द्यावा लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications