खडतर काळातून जाणाऱ्या युझवेंद्र चहलचा विक्रम धोक्यात! हार्दिक पांड्या कोलकात्यात 'हा' पराक्रम करणार
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे. फलंदाजांशिवाय गोलंदाजांनीही आपलं काम चोख बजावलं आहे.
दोन संघांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवर नजर टाकली तर इंग्लंडचा वरचष्मा आहे कारण त्यांचे गोलंदाज आघाडीवर आहेत. मात्र, नंतर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. शीर्ष पाच गोलंदाजांची माहिती येथे आहे. इंग्लंडचा तेजस्वी वेगवान गोलंदाज जॉर्डन या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या 16 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 24 विकेट घेतल्या आहेत. एका डावात एकदाच 4 बळी घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे.

युझवेंद्र चहल : युझवेंद्र चहलच्या जीवनात सध्या अशांतता सुरु आहे. त्याने एक विक्रम केला असून त्याने भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या टी-2o मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चहलच्या नावावर 11 सामन्यात एकूण 16 विकेट आहेत. एकदा चहलने 5 विकेटही घेतल्या होत्या.
हार्दिक पांड्या: आता हार्दिक पांड्या आणि चहल यांच्यात दोन विकेट्सचा फरक आहे. कोलकाता T20 मध्ये पांड्याला चहलशी बरोबरी करण्याची किंवा त्याला मागे टाकण्याची प्रत्येक संधी आहे. हार्दिकने इंग्लंडविरुद्ध 15 सामने खेळून 14 विकेट घेतल्या आहेत. दोन वेळा त्याने 4 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
जसप्रीत बुमराह : भारतीय संघाचा सर्वात धुरंधर गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळणार नसून त्याचे नाव या यादीत नोंद आहे. बुमराहने टीम इंडियासाठी 5 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचा इकाॅनाॅमी रेट 5 च्या थोडा वर आहे.
भुवनेश्वर कुमार : भारतीय संघाबाहेर असलेला स्विंगचा बादशाह भुवीचे नावही या यादीत आहे आणि तो पाचव्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरुद्धच्या 10 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications