मॅच जिंकू शकत नसल्याने बेन स्ट्रोक्स्टचा मैदानात ड्रामा, जडेजा-सुंदरचे चोख प्रत्युत्तर,वाचा काय घडलं
Ind vs Eng 4th Test Result Ben Stokes drama on field : भारत आणि इंग्लड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहीला. या सामन्यात इंग्लंडला आपण सहज जिंकू असे वाटले पण भारतीय फलंदाजांनी त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. यात महत्वाचा वाटा रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा होता. वॉशिंग्टनने तर कमालच केली आणि आपले पहिले वहिले शतकही साजरे केले. हे सर्व घडण्याआधी इंग्लंडच्या कर्णधाराने कुटील डाव खेळला पण तो भारतीय जोडीने हाणून पाडला आणि इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले.
भारत आणि इंग्लड यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आता प्रतिक्रीया येत आहेत. रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑल राऊंडर्सनी कसोटी सामन्याचा अखेरचा दिवस गाजवला. एकवेळ भारताचे दोन गडी लवकर बाद झाले होते त्यानंतर गिल के.एल. राहूलनंतर रविंद्र आणि वॉशिंग्टनने डाव सांभाळत संघाला हरण्यापासून तारले.

पहिल्या डावात भारताने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली आणि सर्वबाद ३५८ धावा संघाने केल्या. याला इंग्लीश संघाने चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यांनी ६६९ धावा केल्या. आता भारताने दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली. साई सुदर्शन आणि यशस्वी जैस्वाल हे लवकर बाद झाले. त्यानंतर भारताला इंग्लंडने मिळवलेली ३११ धावांची लीड कापणे आवश्यक होते, त्यानुसार गिल आणि के. एल. राहूल यांनी चांगली फलंदाजी केली. यात शुभमन गिल १०३ धावांवर बाद झाला तर के. एल. राहूलचे शतक हुकले तो ९० धावांवर बाद झाला.
सामना जिंकू शकत नसल्याने स्ट्रोक्स्टचा मैदानावर ड्रामा..
रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या उरल्या-सुरल्या विजयाच्या आशा मावळल्या. त्यावेळी इंग्लीश कर्णधार बेन स्ट्रोक्स याने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जडेजा आणि वॉशिंग्टनला सामना अनिर्णित ठेवूया अशी ऑफर दिली. यावर हा माझा काॅल नाही असे रविंद्र जडेजा म्हणाला. त्यावर बेन नाराज झाला. कारण अजून त्यांना सामन्याची १४ षटक टाकायची होती, आणि त्याला त्यांचे खेळाडू अजून थकवणे योग्य वाटत नव्हते पण भारतीय दोन्ही खेळाडू शतकाच्या तोंडावर असताना स्ट्रोक्सने ही चाल खेळली. त्यातच वॉशिंग्टन सुंदरचे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात जीवनातील पहिले कसोटी शतक होणार होते अशावेळी सामना थांबवून शतक हुकवणे योग्य नव्हते.
इंग्लड कर्णधाराला षटकाराने प्रत्युत्तर
इंग्लडची ही चाल समजून दोघांनीही न थांबता खेळण्याचा निर्धार केला. म्हणजेच सामना थांबवायचा की नाही याचा काॅल भारताकडे होता आणि ही मोठी गोष्ट आहे कारण या सामन्यात भारताचे पारडे जड होते असे यातून स्पष्ट झाले. इंग्लंडला सामना थांबवण्यासाठी अक्षरशः विनवणी करावी लागली होती. यानंतर जडेजाने षटकार ठोकत आपले शतक साजरे केले तर नंतर काही वेळातच सुंदरनेही आपले पहिले शतक साजरे केले. त्यानंतर दोघांनी सामना अनिर्णित ठेवण्यासाठी स्ट्रोक्सचा हात मिळवला.
बेन स्ट्रोक्सची काय होती प्रतिक्रीया?
सामना संपल्यानंतर बेन स्टोक्सने जडेजा आणि सुंदरचे कौतुक केले आणि सांगितले की दोघेही उत्तम खेळले. तो म्हणाला की भारताने दबावाखाली खूप मेहनत घेतली, जडेजा आणि सुंदर शतके झळकावू इच्छित होते आणि एक सामना शिल्लक असल्याने मी माझ्या गोलंदाजांना धोक्यात घालू इच्छित नव्हतो असे तो म्हणाला. तर दुसरीकडे, भारतीय कर्णधार गिलने जडेजा आणि गिल दोघांनीही चांगली फलंदाजी केली आणि ते शतके झळकावण्यास पात्र होते असेही म्हटले.












Click it and Unblock the Notifications