Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs BAN Test Match : रोहीत शर्माने केला 3 षटकांतच 'हा' विश्वविक्रम! यशस्वी जैस्वालचाही धमाका!

IND vs BAN Test Match : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत आज चौथ्या दिवशी पावसाने उसंत घेतली त्यामुळे खेळ सुरु झाला. तत्पुर्वी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे या कालावधीत खेळ वाया गेला होता पण आज रोहीत शर्माने आपल्या अफलातून फलंदाजीने केवळ तीन षटकांतच विश्वविक्रम केला तर त्याला जैस्वालनेही यशस्वी साथ दिली.

काय केला विश्वविक्रम?

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल एकत्र धमाका केला आणि जागतिक विक्रम केला. बांगलादेशच्या 233 धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात उतरताच भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून विश्वविक्रम केला. या दोघांनी मिळून अवघ्या 3 षटकांत 50 धावांचा टप्पा पार केला. याआधी इतर कोणत्याही संघाने कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या वेगाने 50 धावा केल्या नाहीत.

IND vs BAN Test Match

भारताच्या 100 धावा अवघ्या 10.1 षटकात पूर्ण

रोहित आणि जैस्वाल यांनी मिळून विश्वविक्रम केला. वेगवान सांघिक अर्धशतकानंतर भारताने सर्वात वेगवान सांघिक शतकाचा विश्वविक्रमही केला. भारताच्या 100 धावा 10.1 षटकात पूर्ण झाल्या. याआधीही हा विक्रम भारताच्या नावावर होता, टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध 12.2 षटकात 100 धावा केल्या होत्या.

रोहित शर्माच्या 11 चेंडूत 23 धावा

तत्पुर्वी बांगलादेशचा संघ 233 धावांवर ऑलआऊट झाला. या खेळादरम्यानही रोहीत शर्मा चमकला त्याने रोहित शर्माने घेतला आश्चर्यकारक झेल घेतला. तर रोहित शर्माने बॅट जोमाने फिरवत 11 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 23 धावांची झटपट खेळी केली. यानंतर तो बाद झाला पण चाहते त्याची कसोटीतील ही खेळी विसरणार नाहीत.

जैस्वालचे 31 चेंडूत अर्धशतक

रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे स्वागत केले, स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले. जैस्वाल आणि रोहितने मिळून 55 धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी केवळ 23 चेंडूंचा सामना करत विश्वविक्रम केला. बांगलादेशचे गोलंदाज काही समजण्यापूर्वीच भारतीय फलंदाजांनी धावा काढण्यास सुरुवात केली. रोहित बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालने खळबळ उडवून दिली आणि 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

पहिल्या दिवशी दमदार खेळ

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने वेगवान विकेट घेत दमदार सुरुवात केली होती. बांगलादेशची धावसंख्या 29/2 अशी झाली. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हक यांच्यातील 51 धावांच्या भक्कम भागीदारीने पाहुण्या संघाला पुन्हा सामन्यात आणले. मात्र, भारताच्या रविचंद्रन अश्विनने शांतोला 31 धावांवर बाद करून ही भागीदारी तोडली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+