IND Vs BAN : कालचा सामना असा झाला की तुम्हीही म्हणाल..वाह! महिला T20 वर्ल्डकपमध्येही आशा पल्लवीत
IND Vs BAN : भारत आणि बांग्लादेश यांच्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली. नेत्रदिपक फटकेबाजी करुन भारतीय संघाने आपणच जगात फलंदाजीतील शहेंशहा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. भारताच्या परुष संघाबरोबरच महिला संघानेही वुमन टी २०च्या वर्ल्डकपमध्ये आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश. भारत आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने स्फोटक कामगिरीचे प्रदर्शन करत पाहुण्या संघाचा पराभव केला. भारतीय संघाने हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा केला. अजून एक सामना बाकी आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि हा निर्णय योग्य ठरला.

भारताचे सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक 15 धावा करून पुढे गेले. त्याच्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव वैयक्तिक 8 धावांवर बाद झाला. कठीण परिस्थितीत नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी भारतीय संघासाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी अर्धशतके झळकावली.
नितीश रेड्डी यांनी तुफानी शैलीत खेळत 34 चेंडूत 74 धावांची खेळी केली. रिंकू सिंगने 29 चेंडूंचा सामना करत 53 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर हार्दिक पांड्यानेही काही मोठे फटके मारले आणि 19 चेंडूंचा सामना करत 32 धावा केल्या. अर्शदीपनेही षटकार ठोकला.
भारतीय संघाने 9 गड्यांच्या मोबदल्यात 221 धावांची मोठी धावसंख्या उभारून बांगलादेशचा मार्ग अवघड करून टाकला. यानंतर प्रत्युत्तराचा डाव खेळताना बांगलादेशने एकापाठोपाठ एक गडी गमावला. अर्शदीप सिंगने पहिली विकेट घेतली. नंतर बाकीच्या गोलंदाजांनीही हात दाखवला.
बांगलादेशकडून महमुदुल्लाहने 41 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकापर्यंत 135 धावा करून बांगलादेशचा संघ सर्वबाद झाला. वरुण चक्रवर्ती आणि नितीश रेड्डी यांनी दोन-दोन बळी घेतले. दुसरीकडे, महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेला हरवून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाचा 82 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम खेळताना टीम इंडियाने 3 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या 19 धावांवर बाद झाला.












Click it and Unblock the Notifications