अक्षर पटेलची हॅट्रीक थोडक्यात हुकली! रोहीतने झेल सोडला; सलग 2 चेंडूवर बांगलादेशचे 2 फलंदाज केले बाद
Ind vs Ban : चॅम्पियन ट्राफीत भारत आणि बांग्लादेश आमने सामने असून आधी मोहम्मद शमी तर नंतर अक्षर पटेलने कहर केला आहे. या दोघांनी मिळून बांगलादेशची फलंदाजी खिळखीळी केली आहे. अक्षर पटेलला एक अनोखी संधी आली होती, सलग दोन चेंडूवर दोन गडी बाद केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने झेल सोडला आणि अक्षरची संधी हातची हुकली.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ गोलंदाजीसाठी उतरला. भारतीय संघाचे गोलंदाज अक्षर पटेल आणि मो. शमीने बांगलादेशचा निम्म्याच्या जवळपास संघ गारद करत फलंदाजीचा कणाच मोडला.

अक्षर पटेलच्या दोन विकेट्स
अक्षर पटेलने तंजीद हसनची विकेट मिळवली. तंजीद हसन 25 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तो यष्टीरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला. तर अक्षर पटेलने दुसरा गडी बाद केला तो मुशफिकुर रहीम याच्या रुपात... त्याला अक्षरने यष्टीरक्षक के. एल. राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. मुशफिकूरला खातेही उघडता आले नाही.
..अन् अक्षरने संधी गमावली
अक्षरने आपल्या एकाच षटकात तंजीद हसन आणि मुशफिकूर रहीम हे बांगलादेशचे दोन मोहरे बाद केले. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीवर तिसरी विकेट पडता पडता वाचली. याला कारण रोहित शर्मा होता. अक्षरने गोलंदाजी करताच उडालेला झेल रोहीत शर्माने सोडला त्यामुळे अक्षरची हॅट्रीक हुकली त्याला सलग तीन चेंडूवर तीन गडी बाद करता आले नाही जर ही कामगिरी त्याने केली असती तर ती कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला असता.
मोहम्मद शमीने घेतल्या दोन विकेट्स
मोहम्मद शमीने मेहदी हसन मिराज (5 धावा) आणि सौम्या सरकार (0) यांनाही बाद केले. हर्षित राणाने कर्णधार नझमुल हुसेन शांतोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि बांगलादेश फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. हा सामना 2017 च्या हंगामात झाला. त्यानंतर बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताला बांगलादेशने 264 धावांचे आव्हान दिले होते हे आव्हान भारताने एक गड्याच्या मोबदल्यात पुर्ण करत 265 धावा पार केल्या, यामध्ये कर्णधार रोहित शर्माने 123 धावांची नाबाद खेळी केली. हा चॅम्पियन ट्राफीतील एकमेव सामना होता.












Click it and Unblock the Notifications