Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जसप्रीत बुमराह जखमी ? अचानक सामना सोडून स्टेडियमबाहेर गेल्याने टीम इंडियासह चाहते टेंशनमध्ये

Ind vs Aus, Jasprit Bumrah: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने सामना सुरु असताना अचानक मैदान सोडलं. त्यामुळे टीम इंडियासह चाहत्यांना टेंशनमध्ये टाकलं आहे.

बुमराह हा भारतासाठी सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. बुमराह संघात नसेल तर भारतीय संघाच्या गोलंदाजीची ताकद कमी होऊ शकते. जसप्रीत बुमराहला कसोटी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवण्याचा अनुभव आहे. या मालिकेदरम्यान त्याने अनेकदा एकहाती सामना फिरवला आहे.

jasprit bumrah

जसप्रीत बुमराहने अचानक मैदान सोडलं

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह लंच ब्रेकनंतर एक षटक टाकल्यानंतर मैदानातून बाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ बुमराह मैदानावर परत न आल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी चिंतेचे कारण बनलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सांभाळलं. बुमराह कदाचित फिटनेसमुळे मैदानाबाहेर गेला असावा असं बोललं जात आहे. दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बुमराह मैदान सोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ टीम इंडियासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बुमराहच्या फिटनेसवर याआधीही प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्याच्या अचानक अनुपस्थितीमुळे त्याला गंभीर दुखापत झाली की काय अशी भीती चाहत्यांना लागली होती. या परिस्थितीत बुमराह लवकर बरा होऊन मैदानात परतेल, अशी भारतीय संघाला आशा आहे, कारण त्याची उपस्थिती संघासाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषत: गोलंदाजीत त्याच्याशिवाय संघ खूपच कमकुवत दिसत आहे.

बुमराहाला दुखापत ?

जसप्रीत बुमराह सिडनी कसोटी सामन्याचे नेतृत्व करत होता, मात्र दुसऱ्या सत्रात दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला होता. व्हिडिओमध्ये तो ट्रेनिंग किट घालून स्टेडियममधून बाहेर पडताना दिसत होता, ज्यामध्ये तो स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये जात असल्याची शंका आहे.

दरम्यान याबाबत अद्याप बीसीसीआय किंवा टीम मॅनेंजमेंटकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेले नाही, त्यामुळे परिस्थितीबाबत संदिग्धता कायम आहे. बुमराहची दुखापत गंभीर असेल तर तो संघासाठी मोठा धक्का असू शकतो, कारण तो भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा महत्त्वाचा भाग आहे. आता पुढील परिस्थितीबाबत बीसीसीआयकडून अधिकृत निवेदन येणे बाकी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+