Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs AUS: गंभीर नाराज, ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना दिला इशारा, मेलबर्नमध्ये काय घडलं जाणून घ्या

IND vs AUS: मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी ज्या प्रकारे खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या त्याबद्दल क्रिकेटप्रेमींसह मॅनेजमेंट ना खूश आहे. सामन्यापूर्वी केलेले नियोजन मैदानावर सतत बदलत असते. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यावर नाराजी व्यक्ती केली आहे.

दरम्यान रिपोर्टवर विश्वास ठेवला तर गौतम गंभीरने खेळाडूंना सामन्यापूर्वीच्या प्लॅननुसार खेळ करावा, असं सांगितले आहे. गौतम गंभीरने स्पष्टपणे खेळाडूंना प्लॅननुसार जाण्यास सांगितले आहे. खेळाडूंनी निष्काळजीपणे शॉट्स खेळल्याबद्दल गंभीरने नाराजी व्यक्त केली आहे.

gautam gambhir

मेलबर्न कसोटीनंतर ड्रेसिंग रूममध्ये गंभीर आनंदी नव्हता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार गंभीरने आपल्या खेळाडूंना स्पष्टपणे सांगितले की, खूप झाले आता. प्लॅननुसार क्रिकेट खेळा. खराब शॉट निवडीमुळे गंभीर नाराज दिसत होता.

रोहित शर्मा, कोहली, ऋषभ पंत आणि जैस्वाल खराब फटके खेळून बाद झाले. या खेळाडूंनी आपल्या शॉट्सची निवड योग्य ठेवली असती तर कदाचित मेलबर्न कसोटी सामना वाचवता आला असता. अंतिम सत्रात पराभव झाल्यानंतर चाहतेही संतापले आहेत.

कोहली एका चेंडूचा पाठलाग करताना बाद झाला, तर रोहित शर्मा ऑफ साईडने चेंडू फ्लिक करत होता. ऋषभ पंत नैसर्गिक खेळाचे नाव घेऊन बाहेर पडतो पण अर्धवेळ फिरकीपटूच्या चेंडूवर बाद होतो. जैस्वालने लेग साइडला जाणारा शॉर्ट बॉलही खेळला.

ऑस्ट्रेलिया आता मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून टीम इंडियावर निश्चितच दडपण आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील टप्प्यात जाण्यात अडचणी येत आहेत. टीम इंडिया आता सिडनीमध्ये पराभव झाला तर पुढच्या टप्प्यात जाणे कठीण आहे. भारताला सिडनी कसोटी सामना जिंकून आपले सर्वोत्तम द्यावे लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+