गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक, द्रविडची जागा घेणार, कार्यकाळ 2027 पर्यंत
मुंबई - माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. त्यांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली.
द्रविडचा कार्यकाळ संपला
42 वर्षीय गंभीर राहुल द्रविडची जागा घेणार आहे. राहूल द्रविद द वॉल म्हणून प्रसिद्ध आहे. टी-२० विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला आहे.

गंभीरने दीड महिन्यांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल-2024 चा चॅम्पियन बनवले होते. तो यावर्षी कोलकाता फ्रँचायझीचा मेंटर झाला. इतकेच नाही तर त्याच्या मार्गदर्शनाखाली गंभीरने लखनौ सुपर जायंट्स संघाला सलग दोन हंगाम प्लेऑफमध्ये नेले होते.
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
2027 पर्यंत गौतम गंभीर प्रशिक्षक
भारतीय क्रिकेट संघाने टी- ट्वेंटी विश्वकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा असेलेला राहूल द्रविड यांच्या जागी आता एकेकाळचा स्टार फलंदाज गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. तो आता 2027 पर्यंत भारतीय क्रिकेटसंघाचा प्रशिक्षक राहणार आहे. या काळात तो मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सांभाळेल.
जय शहा यांचे ट्विट
एक्स वर या संदर्भात जय शहा यांनी एक ट्विट केले आहे, त्यात त्यांनी गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळेल असे त्यांनी घोषित केले आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे.
गौतम गंभीने संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिका पार पाडत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे, मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे. टीम इंडियासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवासह प्रशिक्षकाची भूमिका तो उत्तम प्रकारेपार पाडेल.
द्रविड 2021 मध्ये झाला होता मुख्य कोच
राहुल द्रविडला नोव्हेंबर 2021 मध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्यावेळी टीम इंडिया टी- 20 विश्वचषकातून बाहेर पडली होती. 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने पुन्हा उपांत्य फेरी गाठली. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला, परंतु त्याचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर द्रविडने भारताला टी-20 मध्ये विश्वविजेता बनवले. 29 जून रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषक जिंकला.












Click it and Unblock the Notifications