टीम इंडियाचा कोच होताच गौतम गंभीरला मोठा धक्का! बीसीसीआयने हा प्रस्ताव नाकारला
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गौतम गंभीरला एक मोठा धक्का बसला आहे. ताजे वृत्त हे आहे की, गंभीरने भारतीय संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जॉन्टी रोड्सचा समावेश करण्यास सांगितले होते, परंतु भारतीय क्रिकेट बोर्डाने ही विनंती नाकारली आहे. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळताच बीसीसीआयने धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
का नाकारली गंभीरची मागणी?
सर्व जुन्या स्पोर्ट स्टाफमधील फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप - भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी नव्या प्रशिक्षकाची गरज आहे. पण माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी गौतम गंभीरची पहिली पसंती नाकारली आहे.

टी. दिलीप यांचा कार्यकाळ वाढू शकतो
गौतम गंभीरची मागणी बीसीसीआयने नाकारल्यामुळे याचा दुसरा अर्थ टी. दिलीप भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून पुढे राहू शकतात. भारतीय टीमने यंदाचा आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने 2023 वनडे विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय उपविजेतेपदाची कामगिरी केली होती. त्यामुळे गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर, त्याला एक मजबूत भारतीय टीम मिळाली आहे.
गंभीरसमोर अनेक आव्हाने
गौतम गंभीर 2027 पर्यंत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहणार आहे. त्याच्यासमोर या कार्यकाळात अनेक आव्हाने आहेत.ड्रेसिंग रूममधील खेळाडूंशी जुळवून घेणे हे गंभीरसमोर पहिले आव्हान असेल. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याच्या गंभीरकडे पुरेसा पूर्व प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही. तसेच आता भारतीय संघ क्रिकेटच्या सर्वप्रकारात अग्रस्थानी आहे हे स्थान आणि सातत्य गंभीरला कायम ठेवावे लागणार आहे.
द्रविड 2021 मध्ये झाला होता मुख्य कोच
राहुल द्रविडला नोव्हेंबर 2021 मध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्यावेळी टीम इंडिया टी- 20 विश्वचषकातून बाहेर पडली होती. 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने पुन्हा उपांत्य फेरी गाठली. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला, परंतु त्याचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला.
त्यानंतर द्रविडने भारताला टी-20 मध्ये विश्वविजेता बनवले. 29 जून रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषक जिंकला. द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने 2023 मध्ये आशिया कपही जिंकला आहे. यजमान श्रीलंकेचा पराभव करत भारताने विजेतेपद पटकावले.












Click it and Unblock the Notifications