गौतम गंभीरचे हे 5 निर्णय, ज्यामुळे भारतीय संघाला 12 वर्षांनंतर मिळालं एकदिवसीय विजेतेपद
IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून भारतीय संघाने रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलं आहे. याबद्दल रोहित शर्माचे खूप कौतुक होत आहे. पण गौतम गंभीरचे योगदान कमी लेखता येणार नाही. गौतम गंभीरने संघात असे अनेक बदल केले, ज्याचा निकाल सर्वांसमोर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान भारतीय संघात काही बदल केल्यानंतर गंभीरवर प्रश्न उपस्थित केले गेले असले तरी त्याने शांतपणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले. गौतम गंभीरच्या चिकाटीने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्यांच्या पाच प्रमुख निर्णय घेतले आहेत. कोणते आहेत हे पाच निर्णय जाणून घेऊया.

संघात फिरकी गोलंदाजांना आणणे
जेव्हा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जात होता तेव्हा प्रश्न असा होता की, अष्टपैलू खेळाडूंसह पाच फिरकीपटू आणण्याची गरज होती का? बुमराहला बाहेर करण्यात आले तेव्हा वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला. त्यावेळी खूप गोष्टी बोलल्या जात होत्या पण वरुण चक्रवर्तीची निवड योग्य असल्याचे सिद्ध झाले. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये आणून गंभीरने त्याचा क्रिकेट अनुभव दाखवला.
ऋषभ पंतला बाहेर ठेवणे
पंत यष्टिरक्षक म्हणून खेळत होता पण त्याला बाहेर ठेवण्यात आलं आणि केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. के एल राहुलने विकेटकीपिंग सोबतच फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा त्याने शानदार कामगिरी केली. राहुलने अंतिम सामन्यातही फिनिशिंग टच देत सामने जिंकून दिले आहेत.
अक्षर पटेलचा योग्य वापर
डाव्या-उजव्या जोडीसाठी अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि ते फायदेशीरही ठरले. अक्षर पटेलने त्याच्या छोट्या आणि उपयुक्त खेळीने संघासाठी काम केले. अंतिम सामन्यात अक्षर पटेलने २९ धावांची खेळी केली.
एका वेगवान गोलंदाजाचा निर्णय
शमीला स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि हा निर्णय प्रभावी ठरला. भारताचा सामना करणाऱ्या प्रत्येक संघाला फिरकीपटूंविरुद्ध खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका वेगवान गोलंदाजाच्या आणि उर्वरित फिरकीपटूंच्या मदतीने टीम इंडियाच्या जेतेपदाच्या विजयात काम केले.
विजयी संघासह जाण्याचा निर्णय
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर संघ अंतिम फेरीपर्यंत दुबई येथेच राहील असे वाटत होते. असंचं काहीतरी पाहायला मिळालं. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आणि विजयी संघासह जाण्याचा निर्णय घेण्यात आला. बेंचवरील खेळाडू बेंचवरच बसून राहिले.












Click it and Unblock the Notifications