Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची पहिली बॅच दुूबईला रवाना, कधी आहे पहिला सामना?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 साठी भारतीय संघाची पहिली तुकडी शनिवारी दुबईला रवाना झाली आहे. एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह काही खेळाडू मुंबई विमानतळावर दिसत आहेत.

Champions Trophy 2025

भारताचे सर्व सामने दुबईत होणार

19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जातील. स्पर्धेतील उर्वरित सामने पाकिस्तानमधील कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळवले जातील.

टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई येथे होईल.

अंतिम सामना 9 मार्चला खेळला जाणार

हायब्रिड मॉडेलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल. या 19 दिवसांच्या स्पर्धेत 15 सामने खेळवले जातील. दुसऱ्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये खेळला जाईल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामनाही दुबईमध्येच होईल. स्पर्धेतील उर्वरित 10 सामने पाकिस्तानमध्ये होतील.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव. राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+