ऑस्ट्रेलियात भारतीय खेळाडूंसोबत घडलं असं काही, बीसीसीआयनं घेतला मोठा निर्णय
IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी सराव सत्रादरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंना गोंधळाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान प्रेक्षक मैदानावर दाखल झाले होते. त्यामुळे खेळाडूंना काहीशी धक्का-बुक्कीचा त्रास सहन करावा लागला. भारतीय संघाने यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे आता सराव सत्र दरम्यान प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश दिला जाणार नाही.
भारतीय संघातील खेळाडूंसोबत मंगळवारी सराव करत असताना चाहते मोठ्या संख्येने चाहते जमले होते. बीसीसीआयने या प्रकरणी आपला आक्षेप नोंदवला असून सराव सत्रापासून चाहत्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ॲडलेडमध्ये टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान मोठ्या संख्येने चाहते आले होते. खेळण्याच्या तयारीत असलेल्या खेळाडूंजवळ आलेल्या चाहत्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे वातावरणही काही काळ चांगलेच बिघडले होते.
चाहत्यांनी घोषणाबाजी करत खेळाडूंचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सराव करणे खूप कठीण झाले होते. दुसऱ्या कसोटीच्या काही दिवस आधी अशी परिस्थिती पाहून भारतीय बोर्डाने या प्रकरणाची तक्रार ऑस्ट्रेलियायन क्रिकेट बोर्डाकडे केली होती.
दरम्यान प्रेक्षकांनी सतत खेळाडूंना चौकार आणि षटकार मारण्याची मागणी करण्यात येत होती. याशिवाय नेटमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंसाठीही कॉमेंट्स करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरावाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. हे सर्व नेटच्या अगदी जवळ घडत होते.खेळाडू खेळत असताना सेल्फीची मागणी करणे आणि सतत नारेबाजी करणे हे नियमाविरुध्द घडत होते. यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण असता.त्यामुळे चाहत्यांना सराव सत्रा दरम्यान मैदानात प्रवेश बंद केला आहे.












Click it and Unblock the Notifications