IND vs PAK: भारत टॉस हारला आणि केला अनोखा रेकाँर्ड; पाकिस्तानचा पराभव ही 'या'मुळे झाला फिक्स
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमने-सामने आले. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना रविवारी सुरु झाला. कोणता संघ नाणेफेक जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकली. इथे रिझवानने नाणेफेक जिंकली आणि तिथे भारताने सलग सर्वाधिक नाणेफेक गमावण्याचा विश्वविक्रमही नोंदवला.

काय नोंदवला रेकॉर्ड?
दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवार(ता. २३) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट- अ सामना सुरु झाला. या सामन्याची नाणेफेक पाकिस्तानने जिंकली. रिझवानने सामन्याचा टाँस उडवला. पण रोहित जे बोलला त्याच्या विरुद्ध बाजू पडली. म्हणजेच भारत टाँस हारला. पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ही नाणेफेक गमावून भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला. भारताने नाणेफेक गमावलेला हा सलग १२ वा सामना होता. हा ट्रेंड २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यापासून सुरू झाला, जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली.
विक्रमही आहे भारतासाठी सुखद
टीम इंडियाकडे सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम आहे. पण इस हार मे भी जीत, असल्यासारखा एक संकेतही आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचा रेकॉर्ड पाहता जो संघ नाणेफेक जिंकतो तो संघ पाचपैकी तीन वेळा पराभूत झाला आहे. २००९ मध्ये भारताने नाणेफेक जिंकली पण पाकिस्तानने सामना जिंकला. त्यानंतर २०१७ च्या गट फेरीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकली पण भारताने जिंकला. त्याच वर्षीच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली पण पाकिस्तानने सामना जिंकला आणि विजेतेपदही जिंकले.
या सामन्यात भारताचे प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी.
पाकिस्तानचे प्लेईंग ११- बाबर आझम, इमाम उल हक, सौद शकील, मोहम्मद रिजवान (कर्णधार), सलमान अली आघा (उपकर्णधार), तैयब ताहिर, खुशदिल शाह, अबरार अहमद, हरिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी












Click it and Unblock the Notifications