Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऑरेंज कॅप कुणाची? सूर्यकुमार आणि विराट कोहलीमध्ये रंगली 'टशन'; कसा झाला फेरबदल? वाचा

आयपीएल २०२५ मध्ये रविवारी झालेल्या दोन सामन्यांनंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये बरीच उलथापालथ झाली. दुपारच्या पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहोचला होता. परंतु रात्री झालेल्या एमआय विरुद्ध सीएसके या सामन्यानंतर सुर्यकुमार यादवने विराट कोहलीची जागा घेत त्याला चौथ्या स्थानावर ढकलले.

IPL Points Table

विराट कोहलीची दमदार खेळी

दिवसाचा खेळ संपताच विराट कोहली (आरसीबी) धावा काढणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. हंगामात ३०० धावा पूर्ण करणारा तो पाचवा फलंदाज होता. परंतु सूर्यकुमार यादव (एमआय) देखील दिवसाच्या अखेरीस तेथे पोहोचला आणि कोहलीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. कोहलीने आतापर्यंत स्पर्धेत सातत्याने धावा केल्या आहेत. रविवार सामन्यात कोहलीने १५८ धावांचा पाठलाग करताना संघाला सात विकेटने विजय मिळवून दिला. त्याने ५४ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या आणि त्यामुळे त्याच्या हंगामातील धावांची संख्या ३२२ झाली आहे. कोहलीसाठी हे हंगामातील चौथे अर्धशतक होते. त्याची सरासरी ६४.४० आहे. या स्पर्धेत तो सरासरीच्या बाबतीत टिम डेव्हिडच्या (१४२.००) च्या मागे आहे.

सूर्यकुमारची दमदार एन्ट्री

सूर्यकुमारने ३० चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. सूर्याच्या या खेळीच्या बळावर एमआयने सीएसकेचा नऊ विकेट्सने पराभव केला. त्याची एकूण धावसंख्या ३३३ वर नेली. आठवड्याच्या शेवटी लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) चा फलंदाज निकोलस पूरन (३६८ धावा) आणि गुजरात टायटन्स (जीटी) चा बी साई सुदर्शन (३६५) पहिल्या दोन क्रमांकावर होते. जीटी सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध सामना खेळेल. ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी साई सुदर्शनला फक्त चार धावांची आवश्यकता आहे.

सर्वाधिक विकेट कुणाच्या?

रविवारी जीटीच्या टेबल-टॉपर प्रसिद्ध कृष्णाच्या १४ विकेट्सच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणारे अनेक गोलंदाज होते , परंतु त्यापैकी कोणालाही विकेट मिळाली नाही. सीएसकेचे नूर अहमद आणि खलील अहमद , जोश हेझलवूड (आरसीबी) आणि एमआय कर्णधार हार्दिक पंड्या आपापल्या सामन्यात विकेट मिळवू शकले नाहीत. प्रसिद्ध कृष्णा या यादीत आघाडीवर आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) कुलदीप यादव , नूर, हेझलवूड आणि एलएसजीचा शार्दुल ठाकूर प्रत्येकी १२ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर ११ बळीं घेणारे आर साईकिशोर, मोहम्मद सिराज , हार्दिक, अर्शदीप आणि खलील हे पाच गोलंदाज ठरले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+