रोहित शुभमनने रचला इतिहास; २९ वर्षांपूर्वीच्या 'त्या' विक्रमाची बरोबरी आणि केला आणखी एक पराक्रम
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना न्यूझीलंडशी सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या ओपनर्सने पन्नास धावांची पार्टनरशिप करुन सुरुवातीला २९ वर्षांपूर्वीचा विक्रम तोडला. त्यानंतर १०० धावांची भागिदारी करुन चॅम्पियन ट्राँफीत १०० धावांची भागिदारी करण्याचा तिसरा विक्रम नोंदवला. रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी हा विक्रम नोंदवला मात्र भारताच्या १०५ धावसंख्येवर शुभमन गिल आऊट झाला.

दुबईत रंगला फायनल सामना
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. ब्लॅक कॅप्सने रचिन रवींद्र आणि विल यंग यांच्यासह डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी ब्लॅक कॅप्सना चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी ५७ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडची सुरुवात चांगली होऊनही भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराव विकेट घेऊन न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं. अखेर न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर आटोपला.
सलामीविरांनी केला विक्रम
या लक्षाचा पाठलाग कऱण्यासाठी मेन इन ब्लू मैदानात उतरले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताला शानदार सुरुवात करून दिली. गिल आणि शर्मा दोघांनीही ५०+ धावांची सलामी भागीदारी केली. आयसीसी एकदिवसीय बाद फेरीत दोन्ही संघांनी ५०+ धावांची सलामी भागीदारी नोंदवण्याची ही दुसरी वेळ ठरली. २९ वर्षांपूर्वी ९ मार्च १९९६ रोजी बेंगळुरू येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक उपांत्य सामन्यात अशीच पहिली घटना घडली. शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. २००९ मध्ये जोहान्सबर्गच्या वँडरर्स येथे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात पहिल्यांदाच सामना झाला होता त्यात असेच झाले होते.
भारताची फिरकी चालली
न्यूझीलंडला अंतिम फेरीत चांगली सुरुवात होईल अशी आशा होती. तथापि, भारतीय फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीमुळे ब्लॅक कॅप्सना कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले. कुलदीप यादव , वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ब्लॅक कॅप्सना २५१ धावांपर्यंत मर्यादित केले. लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने, भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या संघाला एक शानदार सुरुवात करून दिली. खेळाला ब्लॅक कॅप्सकडे घेऊन जाताना, रोहितची खेळी न्यूझीलंडच्या संघासाठी सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
सलामीवीरांची शतकी सलामी
सलामीवीर रोहित-शुभमन जोडीने १०५ धावा जोडल्या. यापूर्वी नैरोबी येथे २००० साली खेळल्या गेलेल्या चॅम्पियन ट्राँफीच्या फायनलमध्ये सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध १४१ डावांची सलामी भागिदारी केली होती. त्यानंतर २०१७ साली ओव्हल मैदानार झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या फकार झमान व अझअर अली या दोघांनी भारताविरुद्ध १२८ धावांची सलामी भागिदारी केली होती. आजच्या दुबईत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी १०५ धावांची सलामी भागिदारी केली.












Click it and Unblock the Notifications