Champions Trophy 2025- चॅम्पियन ट्रॅाफीसाठी दुबईला जाण्यापूर्वीच टीम इंडियाला झटका; पहा काय झालं?

क्रिडा रसिकांत सर्वात जास्त चर्चेत असलेली चॅम्पियन्स ट्राँफी १९ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. भारतीय संघाला त्यांचा पहिला सामना बांगलादेशसोबत २० फेब्रुवारीला खेळायचा आहे. त्यासाठी टीम इंडिया शनिवारी म्हणजेच १५ फेब्रुवारीला दुबईला जाणार आहे. मात्र भारतीय संघ रवाना होण्यापूर्वीच एक मोठी बातमी हाती आली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना चांगलाच झटका बसला आहे.

Champions Trophy 2025

२० फेब्रुवारीपासून सुरुवात

चॅम्पियन ट्राँफी-२०२५ च्या रणसंग्रामाला येत्या २० फेब्रुवारीपासून टीम इंडियाची सुरुवात करणार आहे. त्यांचा पहिला सामना बांगलादेशसोबत होईल. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पाकिस्तान, २ मार्चला न्यूझीलंड संघासोबत लढत होईल. भारतीय संघ त्यासाठी येत्या १५ फेब्रुवारीपासून दुबईला जाणार आहे.

बीसीसीआयचा निर्णय काय?

चॅम्पियन ट्राँफी २०२५ ही स्पर्धा साधारणः तीन आठवडे चालणार आहे. त्यामुळे खेळाडूंना आपल्या परिवारातील सदस्यांना या दौऱ्यात घेऊन जाता येणार नाही. बीसीसीआयच्या नियमानुसार जर एखादा दौरा ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्तीचा असेल तरच परिवारतील दोन सदस्य खेळाडूंना आपल्यासोबत नेता येतात. परंतु हा दौरा फक्त तीन आठवड्यांचा असल्याने खेळाडूंना आपली पत्नी किंवा इतरांना नेता येणार नाही. या निर्णयामुळे खेळाडूंना धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

नियमात सूट काय?

चॅम्पियन ट्राँफीचा दौरा फक्त तीन आठवड्यांचा असल्याने खेळाडूंना आपल्या परिवाराला सोबत घेता येणार नाही. परंतु ज्यांना आपल्या परिवाराला सोबत घ्यायचे असेल त्यांना घरातील सदस्यांचा खर्च स्वतः करावा लागेल, असेही बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+