Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-पाक हाय व्होल्टेज सामना कधी आणि कुठे होणार? हायब्रीड मॉडेलचा फायदा कोणाला ?

Champions Trophy 2025 Schedule India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संदर्भात काही रिपोर्ट समोर आले आहेत. त्यानुसार असं म्हटलं जातं की आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळली जाऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यापूर्वी या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार नव्हते, परंतु आता काही अटींसह ते स्वीकारण्यास तयार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणे अपेक्षित आहे.

हायब्रीड मॉडेलचा अर्थ काय?

हायब्रीड मॉडेलचा अर्थ असा आहे की, या स्पर्धेतील काही सामने पाकिस्तानमध्ये होतील तर इतर सामने यूएईमध्ये होतील. रिपोर्टनुसार भारतीय संघ युएईमध्ये आपले सर्व सामने खेळू शकतो. परंतु अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय या स्पर्धेच्या दोन उपांत्य फेरीतील एक सामना पाकिस्तानच्या लाहोर शहरात आणि दुसरा दुबई (यूएई) येथे होऊ शकतो.

Champions Trophy 2025

पाकिस्तानने घातली ही अट

हायब्रीड मॉडेलचा अर्थ असा आहे की, पाकिस्तान आपला संघ भारतात पाठवण्याऐवजी इतर ठिकाणी काही सामने खेळेल, जसे की यंदाच्या आशिया चषकात होते. याचा अर्थ असा होईल की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व सामने भारतात होणार नाहीत. परंतु काही सामने इतर देशांमध्ये खेळले जाऊ शकतात. याशिवाय पीसीबीने आयसीसीकडे आणखी निधीची मागणी केली आहे. आयसीसीने यापूर्वीच पाकिस्तानला सुमारे 550 कोटी रुपये दिले आहेत, परंतु आता पीसीबी अधिक निधीची मागणी करत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याचा आयसीसीचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) स्वीकारला असल्याची बातमी समोर येताच, भारताच्या सामन्यांचे संभाव्य वेळापत्रक इंटरनेटवर व्हायरल झालं आहे. व्हायरल पोस्टनुसार प्रत्येक संघासाठी 3 गट सामने असतील आणि मेन इन ब्लू चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने होईल.

भारत-पाकिस्तान सामना कोणत्या दिवशी होणार?

भारताचा दुसरा सामना 23 फेब्रुवारी 2024 रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. व्हायरल पोस्टनुसार 1 मार्च 2024 रोजी दुबईमध्ये हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील होणार आहे. हा सामना हायब्रीड मॉडेलमध्ये झाला तर त्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. कारण पाकिस्तानच्या खेळाडूंनी दुबईत भारतापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीसमोर मोठी अट ठेवली आहे. रिपोर्टनुसार पीसीबीचे म्हणणे आहे की, 2031 पर्यंत भारतात होणाऱ्या सर्व आयसीसी टूर्नामेंट्स हायब्रिड मॉडेल अंतर्गत आयोजित केल्या पाहिजेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+