Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

india vs pakistan : भारत पाकमध्ये आज युद्ध; आजपर्यंत कुणी किती मॅच जिंकले? वाचा हेड-टू-हेड रेकाॅर्ड

IND VS PAK- Head-To-Head : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी 23 फेब्रुवारी 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय प्रोफाइल सामना आहे. सर्वच क्रीडा रसिकांना या मॅचची प्रतीक्षा आहे. हा सामना कधी कुठे होणार आणि आतापर्यंत भारतिय संघ आणि पाकिस्तानी संघ कितीवेळा आमने-सामने आला आणि कुणी किती विजय मिळवले याची हेड टु हेड माहिती क्रीडा रसिकांसाठी देत आहोत.

दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतासाठी एक आकडेवारी विलक्षण आणि हृदयस्पर्शी आहे. या मैदानावर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध दोनदा एकदिवसीय (International ODI) प्रकारात सामने खेळले आहेत. टीम इंडियाने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. आता भारताला या मैदानावर पाकिस्तानी संघाविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याची मोठी व सुवर्णसंधीच आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीतील पर्दापणातील पहिला सामना गमावलेला असल्याने ते विजयासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे, हे मात्र नक्की...!

Champions Trophy 2025

यापूर्वी कधी व केव्हा आले होते दोन्ही संघ आमनेसामने?

19 सप्टेंबर 2018 रोजी आशिया कपमध्ये दोन्ही देश पहिल्यांदाच येथे आमनेसामने आले. तेव्हा भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर प्रथम खेळणाऱ्या पाकिस्तानने 162 धावा केल्या. 'प्लेअर ऑफ द मॅच' भुवनेश्वर कुमारने 7 षटकांत 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. केदार जाधव (3 विकेट्स) आणि जसप्रीत बुमराह (2 विकेट्स) यांनीही शानदार गोलंदाजी केली. धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (52) चमकला. त्यानंतर सलामीवीर शिखर धवन (46) त्यानंतर दिनेश कार्तिक (31*) आणि अंबाती रायुडू (31*) यांनीही प्रभावी खेळी केल्या.

दुबईमध्येच, 23 सप्टेंबर 2018 रोजी, पुन्हा एकदा दोन्ही देश 'सुपर-फोर' मध्ये आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 237/7 धावा केल्या. शोएब मलिकने 78 धावांची खेळी खेळली. नंतर, कर्णधार रोहित शर्मा (111*) आणि शिखर धवन (114) यांच्या शतकांमुळे भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला.

दुबईत भारताचा दोन वेळा विजय!

म्हणजेच, जेव्हा जेव्हा दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी दुबईमध्ये एकमेकांशी भिडले आहेत. भारत नेहमीच जिंकला आहे. तर एकूण एकदिवसीय आकडेवारीत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. दोन्ही देशांदरम्यान एकूण 135 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 57 वेळा आणि पाकिस्तानने 73 वेळा विजय मिळवला आहे. 5 सामन्यांचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत.

पाकिस्तानने पहिला सामना गमावला!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर आता पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध जिंकावेच लागेल. हा सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरो असा असेल. कारण जर ते भारतीय संघाकडून हरले तर त्यांना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणे खूप कठीण होईल.

पाकला हरवले तर भारताचे सेमीफायनल तिकीट निश्चितच

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले होते. जर टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचे तिकीट जवळजवळ निश्चित होईल. जर पाकिस्तानी संघ हरला तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न भंग होईल.

रोहित शर्मा पाकिस्तानी संघाविरुद्धच्या अंतिम अकरा प्लेअर्समध्ये फारसे बदल करणार नाही. दुखापतग्रस्त फखर जमानच्या जागी इमाम-उल-हक पाकिस्तानी संघात खेळताना दिसेल.

पाकिस्तानविरुद्ध भारताचे संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.

भारताविरुद्ध पाकिस्तानचे संभाव्य खेळणारे 11 खेळाडू

बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार, यष्टीरक्षक), इमाम-उल-हक, सलमान अली आघा (उपकर्णधार), तय्यब ताहिर, खुशदिल शाह, अबरार अहमद, हरिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी

भारत-पाकिस्तान

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण सामने - 135
  • भारताने जिंकले - 57
  • पाकिस्तानने जिंकले - 73
  • बरोबरी - 0
  • निकाल नाही - 5
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+