भारत-पाकिस्तान मॅच कोण जिंकणार? IIT बाबांनी अशी भविष्यवाणी केली की लोक संतापले! वाचा काय झालं
Champions trophy 2025, IND vs PAK Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना आज 23 फेब्रुवारी 2025 रोजी रंगणार आहे. या सामन्यापुर्वी महाकुंभात चर्चेत आलेले आयआयटी बाबा यांनी एक भविष्यवाणी केली आणि त्याचाच संताप क्रीडा रसिकांमध्ये व्यक्त झाला त्याला कारणही तसेच आहे. आपण या लेखात बाबांची भविष्यवाणी काय होती आणि नेमके रसिक का संतापले हे जाणून घेऊ.
भारतीय संघ चॅम्पियन ट्राॅफीसाठी फुल फार्मात आहे. बांगलादेशविरुद्ध पहिली मॅच जिंकल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता 20 फेब्रुवारीची लढत तर आहेच; पण नजरा 23 फेब्रुवारीला होणाऱ्या मॅचकडे लागल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्या दिवशी सामना होणार आहे.
पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहतेही या सामन्याची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांच्यात उत्साह खूप जास्त आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये काही काळापासून तणावाचे वातावरण आहे आणि त्यामुळेच दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळत आहेत.

भारत -पाकिस्तान संघातील हाय व्होल्टेज मॅचपूर्वी महाकुंभ 2025 मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयआयटी बाबा उर्फ अभय सिंह यांनी असे काही अंदाज लावले आहेत. हे अंदाज ऐकल्यानंतर लोक त्यांच्यावर खूप संतापले आहेत आणि सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल देखील करत आहेत.
'टीम इंडियासाठी भारत-पाक सामन्यात जिंकणे खूप कठीण..'
वास्तविक, Rachitrarool LIVE YouTube चॅनलशी बोलताना, IIT बाबा म्हणाले की 'भारतीय क्रिकेटपटू देवाची कृतज्ञता दाखवत नाहीत, त्यामुळे टीम इंडियाला भारत-पाक सामन्यात विजय मिळवणे खूप कठीण आहे, विराट कोहलीने प्रयत्न केले तरी या वेळेस फरक पडणार नाही आणि भारताला विजय मिळवून देण्यात कोणताही फरक पडणार नाही.'
सोशल मीडियावर भारतीय चाहते संतापले
आयआयटीवाले बाबा अर्थात अभय सिंग यांचे हे विधान व्हायरल होताच, भारतीय चाहते सोशल मीडियावर संतापले आणि अभय सिंग यांना प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही लोक त्याच्याबद्दल खूप वाईट बोलले आहेत तर काही लोकांनी त्याला ढोंगी बाबा देखील म्हटले आहे.
'पाकिस्तानला विजयाचा पुर्ण विश्वास'
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना कराचीमध्ये झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तान देश किवी संघाकडून 60 धावांनी पराभूत झाला होता.
'रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना'
दुसरीकडे भारताने सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. 23 फेब्रुवारीनंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. सध्या दोन्ही देशांनी आपापल्या बाजूने भारत-पाकिस्तानसोबतच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली आहे, बघूया त्या दिवशी कोण जिंकणार?
कोण आहेत IIT वाले बाबा अभय सिंह?
महाकुंभ 2025 मध्ये IIT वाले बाबा अभय सिंह यांची गोष्ट समोर आली होती. ते तिथे संत म्हणून पोहोचले होते. जेव्हा त्यांचा फोटो व्हायरल झाला, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना ओळखले आणि तेव्हाच लोकांना समजले की अभय सिंग यांनी संन्यास का घेतला?
IIT Bombay मधून Aerospace Engineering मध्ये ग्रॅज्युएशन
अभय सिंह यांनी IIT Bombay मधून Aerospace Engineering मध्ये ग्रॅज्युएशन केले आहे, ते मूळचे हरियाणाचे आहेत. त्यांनी मास्टर इन डिझाईन (M.Des) केले होते आणि फोटोग्राफर म्हणूनही काम केले होते पण अचानक त्याचा ओढा अध्यात्माकडे आला आणि त्याने सांसारिक जीवन सोडून दिले.
जगाचा भ्रमनिरास करून अध्यात्माचा मार्ग निवडला
काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांत असेही म्हटले आहे की, लहानपणापासूनच त्याला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत होता, सर्व पात्रता असूनही त्याला मानसिक दडपण येत होते, त्यामुळे जगाचा भ्रमनिरास होऊन त्याने अध्यात्माचा मार्ग निवडला. या काळात त्यांनी दिल्ली, धर्मशाळा, ऋषिकेश आदी ठिकाणी आध्यात्मिक अभ्यासही केला.
सोशल मीडियावर लोक संतापले
सोशल मीडियावर लोक संतापले आहेत आणि बाबांना ट्रोल करत आहेत आणि त्यांनी महाकुंभ सोडला पण तो सोशल मीडियावर सतत सक्रिय आहे आणि त्याची लोकप्रियता येथे खूप वाढली आहे. सध्या भारत-पाक सामन्याबाबतच्या त्याच्या अंदाजामुळे लोक त्याच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळेच ते सध्या लोकांच्या निशाण्यावर आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications