Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी शोएब अख्तरच्या वक्तव्याने खळबळ! काय म्हणाला वाचा
Champions Trophy 2025 Ind vs PAK : भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यामध्ये आज क्रिकेट वाॅर रंगणार आहे. आज 23 फेब्रुवारी 2025 रोजी हा सामना दुबईत होणार आहे. या मॅचपुर्वी दिग्गज पाकिस्तानी तेजगती गोलंदाज आणि रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखळा जाणारा खेळाडू शोएब अख्तर याने एक वक्तव्य केले आहे, त्याचे वक्तव्य चर्चेत आहे.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना रविवार, 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे. एकमेकांचे कट्टर आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत- पाकिस्तान सामन्याची रसिकांना मोठी उत्सुकता आहे. हा सामना दुबईतील गर्दीचा रेकाॅर्ड तोडू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी दारूण पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानला आता चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. दुसरीकडे, त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 21 चेंडू राखून 6 विकेट राखून पराभव केला आहे.

आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे लागले आहे. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
Champions Trophy 2025 Ind vs PAK : काय म्हणाला शोएब अख्तर
'रावळपिंडी एक्सप्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेला माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताविरुद्धच्या सामन्याला पाकिस्तानसाठी 'करा किंवा मरो' अशी स्थिती म्हटले आहे. 'आता भारताविरुद्ध जिंकणे पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत हा खूप मजबूत संघ असून आव्हान खडतर आहे. मला विश्वास आहे की, पाकिस्तान संघ भारताचा पराभव करण्यात यशस्वी होईल. पाकिस्तान संघासमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
"मी पाकिस्तान संघाला शुभेच्छा देतो. त्यांनी अधिक आक्रमकपणे खेळले पाहिजे. हे खूप कठीण वाटत आहे, पण मला पाकिस्तानकडून सर्वोत्तम अपेक्षा आहे. 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी, पाकिस्तानने 23 फेब्रुवारीला भारताविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकला पाहिजे." असे शोएब अख्तर म्हणाला.
Champions Trophy 2025 Ind vs PAK : पाकिस्तान संघ दुबईत पोहोचला
भारताविरुद्ध सामन्यासाठी पाकिस्तानी संघ दुबईत पोहोचला आहे; तर दुसरीकडे भारताविरुद्धचा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी खूप कठीण असेल. जर पाकिस्तान भारताविरुद्ध हरला तर ते उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य खेळ-11
Ind vs PAK भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
Ind vs PAK पाकिस्तान: इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद आणि हॅरिस रौफ.












Click it and Unblock the Notifications