CCL 2025 : बंगाल टायगर्सचा सलग तिसरा विजय; मुंबई हिरोजने गचाळ क्षेत्ररक्षणाने गमावला सामना
सेलिब्रीटी क्रिकेट लीग -२०२५ मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात बंगाल टायगर्सने सलग तिसरा विजय मिळवला. त्यांनी सहा विकेटने मुंबई हिरोजचा पराभव केला. कर्णधार जिशूच्या नेतृत्वाखाली बंगालच्या खेळाडूंनी उत्तम खेळ दाखवला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली नाही. बंगालने दोन्ही डावानंतर हा सामना चार गड्यांच्या मोबदल्यातच खिशात घातला.

मुंबईची प्रथम फलंदाजी
मुंबई हिरोजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. मुंबईने पहिल्या १० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात ८८ धावा केल्या. सुरुवातील मुंबईचा संघ लयीत दिसत होता. निशांत आणि शब्बीरने दोन षटकांत १ गड्यांच्या मोबदल्यात ३२ ठावा ठोकल्या. मात्र बंगालच्या गोलंदाजांनी ठरावीक अंतरावर गडी बाद करत, मुंबईवर दडपण कायम ठेवले. बंगालचा स्टार गोलंदाज जीमीने आपली लय कायम ठेवत. मुंबईचे कंबरडे मोडले.
बंगालची संथ सुरुवात
बंगालने दुसऱ्या डावाची सुरुवात संथ केली. पहिल्या दोन षटकांत फक्त १६ धावा निघाल्या. बंगालचा ओपनर फलंदाज राहुल लवकर बाद झाला. त्यानंतर जॉय आणि आदित्यने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबईने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत जॉयला बाद केले. मुंबईने आपले क्षेत्ररक्षण कडक केले आणि आणखी दोन विकेट्स घेतल्याने दबाव वाढवला. बंगालची धावसंख्या ६ षटकांत ४७/४ अशी झाली. तथापि, मुंबईच्या क्षेत्ररक्षणातील चुका महागात पडल्या. मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी महत्त्वाचे झेल सोडले. शेवटच्या चार षटकांत ३९ धावांची आवश्यकता असताना, बंगालचा कर्णधार जिशू आणि युसूफ यांनी संयमी खेळ केला.
मुंबईचे गचाळ क्षेत्ररक्षण
दव आणि चेंडू बदलल्यामुळे खेळ मंदावला, परंतु बंगालने हळूहळू लक्ष्य गाठले. जिशूने कर्णधाराची खेळी साकारली. युसूफने त्याला मोलाची साथ दिली. मुंबईला सामना त्यांच्या बाजूने वळवण्याच्या संधी होत्या, परंतु महत्त्वाच्या चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे त्यांना महागात पडले. जिशूने गमावलेल्या संधींचा फायदा उठवला आणि बंगाल टायगर्सना ९.१ षटकांत सहा गडी बाद करून विजय मिळवून दिला. बंगालचा हा स्पर्धेत सलग तिसरा विजय आहे, ज्यामुळे सर्वात मजबूत दावेदारांपैकी एक म्हणून त्यांचे स्थान मजबूत झाले आहे. मुंबई हिरोजने आश्वासक कामगिरी दाखवली असली तरी, येत्या सामन्यांमध्ये त्यांचे नशीब बदलायचे असेल तर त्यांना त्यांच्या क्षेत्ररक्षणातील चुकांवर विचार करावा लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications