Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहित शर्माबाबत जय शाह यांचा मोठा खुलासा, म्हणाले...

मुंबई: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आज एक व्हिडीओद्वारे भारतीयांशी संवाद साधला. या व्हिडीओतून त्यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंचे आभार मानले. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करत विश्वचषकावर नाव कोरले आहे.

Jay Shah

त्यानंतर जयेश शाह व्हिडीओसमोर येऊन आभार व्यक्त करताना दिसले. रोहित शर्माने या वर्ल्डकपनंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र या व्हिडीओतून जयेश शाह यांनी भारतीय चाहत्यांना एक मोठी खुशखबरही दिली आहे.

शाह यांनी हा विश्वचषकातील विजय दिग्गजांना समर्पित केला. शाह म्हणाले, तिन्ही वरिष्ठ खेळाडू यापुढे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाहीत. त्यांनी विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचाही कार्यकाळ संपला आहे. गेल्या 11 वर्षांपासून भारतीय संघाची कमान सांभाळत द्रविडने भारताला टी-20 वल्डकप जिंकून दिला. कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली. मात्र तरीही जयेश शाह यांनी त्याच्याबाबत एक मोठी घोषणा केली.

जय शाहची खुशखबरी

रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी, कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद तोच सांभाळणार आहे. या व्हिडिओतून जयेश शाह यांनी याबाबत खुलासा केला. रोहित कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करत राहील. शाह म्हणाले, 'मला हा विजय राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. या विजयानंतर पुढील मुक्काम 2025 WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे.

जय शाह यांची भविष्यवाणी

जय शाहने एक मोठी भविष्यवाणी केली, ते पुढे म्हणाले की, 'मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू.' शाहने गेल्या वर्षी अहमदाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान बार्बाडोसमध्ये भारतीय संघ तिरंगा फडकवेल, असा शब्द दिला होता. तो शब्द आता खरा ठरला आहे. पुढील वर्षी आयसीसी आणि डब्ल्यूटीसी फायनलबाबतही भारतीय संघाकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+