IND vs PM XI: भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना पावसामुळे थांबला, आता टॉस किती वाजता होणार?
Prime Ministers XI vs India, Warm-up Match: रोहित शर्माचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या पिंक-बॉल कसोटीपूर्वी सराव सामना खेळणार आहे, परंतु हवामानामुळे कॅनबेरामध्ये खेळ सुरू झालेला नाही.
ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन आणि भारत यांच्यातील दोन दिवसीय सराव सामना सकाळी 9:10 वाजता सुरू होणार होता, परंतु पावसामुळे त्याची सुरुवात लांबणीवर पडली आहे. ताज्या अपडेट्सनुसार, टीम इंडिया कॅनबेराहून परतली आहे, त्यामुळे सामना सुरू होण्याची फार कमी आशा आहे.

या सराव सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कॅनबेरा येथे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली होती. कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या संसदेत जोरदार भाषण केलं होतं. आता या सामन्यातून रोहित पुनरागमन करत आहे. दुस-या मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहने संघाच्या कर्णधार पद सांभाळलं होतं. पर्थमधील शानदार विजयानंतर भारताने कसोटी मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने पर्थ कसोटी 295 धावांनी जिंकली, हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा विजय आहे.
पंतप्रधान इलेव्हन संघ: जॅक एडवर्ड्स (क), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महाली बेर्डमन, एडन ओ' कॉनर, जेम रायन.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सरफराज खान, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल.












Click it and Unblock the Notifications