Asian Champions Trophy : हाॅकीत भारतानं पाकिस्तानचा उडवला 2-1 ने धुव्वा!
Asian Champions Trophy India Beat Pakistan :चीनमध्ये सुरू असलेल्या हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम गटातल्या लढतीत आज भारताने पाकिस्तानचा 2-1 असा धुव्वा उडवला आहे.
पाकिस्तानने मागच्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. आज भारताने सामना जिकंला असून गतविजेत्याला धक्का दिला आहे. हा सामना हुलुनबुईर येथील मोकी हॉकी प्रशिक्षण तळावर खेळला गेला. या हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा हा सलग पाचवा विजय आहे. भारताचे दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केले. पाकिस्तानकडून अहमद नदीमने गोल केला.

भारताने जिंकले सर्व पाच सामने
भारतीय संघाने या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व 5 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान 5 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
पाकिस्तानला डागला पहिला गोल
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानच्या अहमद नदीमने पहिल्या क्वार्टरच्या 7व्या मिनिटाला केला. येथे शाहीनने शॉट खेळत असताना चेंडू डीच्या आत टाकला, जो नदीमने डिफ्लेक्ट करून गोल केला. यासह पाकिस्तानने या सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
'सरपंच' साहेबांची कमाल
यानंतर 13व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत बरोबरी साधली. हरमनप्रीत सिंगने गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यावर ड्रॅग फ्लिकसह गोल केला.दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला कर्णधार हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली. अभिषेकच्या इंजेक्शनवर हरमनप्रीतने गोलपोस्टच्या मध्यभागी शॉट घेतला. हे गोल निर्णायक ठरले.
भारताचा पाकिस्तानवर आठवा विजय
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानवरचा हा 8वा विजय आहे. दोन्ही संघांमधील हा 12 वा सामना होता. या काळात पाकिस्तानला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
या स्पर्धेत भारतासह चीन, कोरिया, जपान, मलेशिया आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेची उपांत्य फेरी 16 तारखेला तर अंतिम फेरी 17 सप्टेंबरला होणार आहे.
स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित
भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 13 वर्षांपूर्वी 2011 मध्ये भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आहे. भारताने चार वेळा तर पाकिस्तानने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर 2021 मध्ये दक्षिण कोरियाने विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत भारताने सर्वच्या सर्व पाचही सामने जिकंले असून आतापर्यंत अपराजित आहे.












Click it and Unblock the Notifications