Asia Cup 2025 : आशिया कप भारतात होणार, पण पाकिस्तानला 'नो एंट्री', जाणून घ्या संपूर्ण सामन्यांविषयी
Asia Cup 2025 Schedule India Vs Pakistan Match : आशिया कप वरुन गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. क्रिकबझसह अनेय माध्यमांच्या अहवालानुसार, भारतात होणारा आशिया कप 10 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतो.
तथापि, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) अद्याप यावर कोणतीही पुष्टी केलेली नाही. परंतु, स्पर्धेतील पाकिस्तानचे सर्व सामने हायब्रिड मॉडेलमध्ये म्हणजेच दुसऱ्या देशात खेळवले जातील. अशा परिस्थितीत, तटस्थ स्थळ UAE असू शकते.
यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे स्पर्धेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.
त्यानंतर, भारतातील सर्व सामने UAE मध्ये खेळवले गेले. परंतु, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यावर लवकरच निर्णय घेऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

जुलैत येऊ शकतो टाईमटेबल!
यंदा भारताला यजमान देश बनवण्यात आले आहे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव, स्पर्धा तटस्थ स्थळावर (UAE) आयोजित करण्याची देखील चर्चा सुरू आहे.
पहलगाम हल्ला; भारत-पाकिस्तानात तणाव!
एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने 6 मे मध्यरात्री आणि 7 मे च्या पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवले. पहलगाम हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत, आशिया कपमध्ये पाकिस्तान भारतात येण्याची शक्यता संपली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात एसीसी हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भारताने कितदा जिंकला आशिया कप?
आशिया कप 1984 मध्ये सुरू झाला. ही स्पर्धा आतापर्यंत 16 वेळा खेळली गेली आहे. भारताने सर्वाधिक 8 वेळा जिंकली आहे. त्याच वेळी, श्रीलंकेने 6 वेळा आणि पाकिस्तानने 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही
या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नव्हती. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये झाले होते, इतकेच नाही तर एक सेमीफायनल आणि फायनल देखील यूएईमध्येच झाले होते. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावले.
मुंबई हल्ल्यानंतर द्विपक्षीय मालिका थांबल्या
2008 च्या मुंबई हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मालिका थांबल्या आहेत. आता दोन्ही संघ आता फक्त आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात.
अशा परिस्थितीत, आयोजक आणि प्रसारक भारत-पाकिस्तान सामन्यातून जास्तीत जास्त कमाई करतात. टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये केला होता. भारतीय संघाने 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. या मालिकेतील 2 सामने अनिर्णित राहिले.
तर दुसरीकडे, पाकिस्तान 2013 मध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता: पाकिस्तानने 2012-13 मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता. त्या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली, तर टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली.












Click it and Unblock the Notifications