Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Asia Cup 2025 : भारत-पाक मॅच रद्द झाली, तर BCCIला किती कोटींचा बसेल फटका, आकडा चक्रावणारा!

Asia Cup 2025 : india Vs Pakistan Match : आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय उत्सुकतेचा बनलेला आहे. पण त्याचबरोबर राजकीय तणावामुळे या सामन्याच्या भवितव्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. हा सामना रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. चला तर जाणून घेऊया बीसीसीआय यातून किती कमाई करत असते आणि जर सामना खरच रद्द झाला तर बीसीसीआयला किती कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.

Asia Cup 2025

आशिया कप आणि भारत-पाकिस्तान सामन्याचे महत्त्व

आशिया कप ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित केला जात आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघ सुपर फोर आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यास त्यांचे तीन सामने होऊ शकतात.

भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यांना केवळ क्रिकेटपुरतेच महत्त्व नाही, तर या सामन्यांमध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल होते.

अहवालानुसार, पुढील ४ आशिया कपचे प्रसारण हक्क १७० दशलक्ष डॉलर्समध्ये (सुमारे १५०० कोटी रुपये) विकले गेले आहेत. बीसीसीआयला मिळणाऱ्या या मोठ्या कमाईचे मुख्य कारण भारत-पाकिस्तान सामना हेच आहे.

बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान

जर भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला, तर बीसीसीआयला प्रचंड नुकसान सहन करावे लागेल. याचे कारण असे की, या सामन्यांसाठी जाहिरातीचे दर इतर सामन्यांच्या तुलनेत खूप जास्त असतात.

जाहिरात दर: भारत-पाकिस्तान सामन्यात १० सेकंदांच्या जाहिरातीचा स्लॉट २५-३० लाख रुपयांना विकला जातो. इतर सामन्यांसाठी हा दर याच्या निम्म्याहून कमी असतो.

प्रसारकांचे नुकसान: भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकल्यास प्रसारक नाराज होण्याची शक्यता आहे, कारण हाच सामना सर्वाधिक प्रेक्षकसंख्या आकर्षित करतो. त्यामुळे, स्पर्धेचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता बळावते.

भारत सरकारचे नवे धोरण

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक नवीन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार, भारत पाकिस्तानसोबत कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही आणि पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येऊ देणार नाही.

मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, जसे की आशिया कप आणि विश्वचषक, दोन्ही देशांच्या संघांनी एकमेकांविरुद्ध खेळण्यावर सरकारचा कोणताही आक्षेप नाही.

याचा अर्थ असा की, जरी राजकीय तणाव असला तरी, सरकारच्या धोरणानुसार आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. एकंदरीत, भारत-पाकिस्तान सामना हा केवळ क्रिकेटचा विषय नसून, तो राजकारण आणि अर्थकारणाशीही जोडलेला आहे. जर हा सामना रद्द झाला तर त्याचे थेट परिणाम बीसीसीआयच्या आर्थिक उत्पन्नावर दिसून येतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+