Asia Cup 2025 Final : आशिया कप फायनलमध्ये भारताविरुद्ध कोणता संघ खेळणार, पाकिस्तान की श्रीलंका? वाचा
Asia Cup 2025 Final : आशिया कप टी-२० स्पर्धेत भारताने २४ सप्टेंबर रोजी जोरदार खेळाचे प्रदर्शन करत अंतीम फेरीत प्रवेश केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी झालेल्या 'सुपर फोर' सामन्यात भारताने बांगलादेशला ४१ धावांनी पराभूत केले. यासह फायनलमधील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत भारत अद्यापही अपराजित आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर आता समिकरणं बदलली असून आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेपैकी कोणासोबत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिषेक-कुलदीप चमकले!
भारताच्या या विजयात युवा खेळाडूंचा मोठा वाटा होता. सलामीवीर अभिषेक शर्माने केवळ ३७ चेंडूत ७५ धावांची वादळी खेळी करून भारतासाठी विजयाचा पाया रचला. त्याच्या या आक्रमक खेळीने भारताला पॉवरप्लेमध्येच मोठी आघाडी मिळवून दिली. अभिषेकसोबतच, गोलंदाजीत कुलदीप यादव (३/१८) आणि जसप्रीत बुमराह (२/१८) यांनी बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कुलदीपने मधल्या फळीतील खेळाडूंना बाद करत बांगलादेशचा डाव पूर्णपणे उद्ध्वस्त केला.
पंड्या-चक्रवर्ती यांचा महत्त्वाचा वाटा
फलंदाजीत मधल्या फळीत काहीशी पडझड झाली असली, तरी उपकर्णधार हार्दिक पांड्याने २९ चेंडूत ३८ धावा करून भारताला एक सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या सैफ हसनने ५१ चेंडूत ६९ धावा करून एकट्याने झुंज दिली, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. भारताच्या गोलंदाजांनी, विशेषतः वरुण चक्रवर्ती (२/२९) आणि युवा तिलक वर्माने, बांगलादेशला रोखून धरले.
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये आज पुन्हा भारत Vs पाकिस्तान सामना; कुठे व कसा पाहाल मॅच?
भारताची फायनलमध्ये कोणाशी लढत?
आता २६ सप्टेंबर, गुरुवार रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत भारतासोबत खेळणार आहे. सध्याच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा निव्वळ धावगती (नेट रन रेट) श्रीलंकेपेक्षा चांगला असली तरीही गुण मात्र लंकेचे जास्त आहे म्हणून हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल आणि श्रीलंका अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असणार आहे.
आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती अंतिम सामन्याची, जिथे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार का, की लंकेसोबत सामना होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!












Click it and Unblock the Notifications