गौतम गंभीरचा रोहित सोबत वाद?, विराटलाही नडला होता गंभीर; वाचा- कोच अन् कप्तानमधील वादाच्या कहाण्या
Rohit Sharma Gautam Gambhir Rift : भारतीय क्रिकेट संघ असो किंवा अन्य क्रिकेट संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात वाद होणं नवीन गोष्टी नाही.भारतात यापूर्वी सौरव गांगुली-ग्रेग चॅपल, विराट कोहली- अनिल कुंबळे यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं होतं. आता त्या यादीत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या वादाची देखील भर पडली आहे. कारण काही दिवसापूर्वीच गौतं गंभीर आणि रोहित शर्मामध्ये वादाची ठिणगी पेटल्याची बातमी समोर आली. चला तर जाणून घेऊया, नेमका या दोघांमध्ये कशावरुन वाद पेटलाय, गौतम गंभीरचे यापूर्वी विराट सोबत झालेला नेमका काय आहे वाद.
गंभीरच्या निर्णयावर रोहित नाराज
टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतम गंभीर याला जे निर्णय घ्यायचे आहेत त्या निर्णयांवर रोहित शर्मा खुश नसल्याची माहिती आहे. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात देखील जोरदार वाद झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियामध्ये गटबाजी वाढली आहे. संघातील काही खेळाडू रोहित शर्माच्या बाजूनं आहेत, त्यामुळे टीम इंडियात आता दोन गट पडले आहेत.

वादाचं कारण काय?
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर संघामध्ये रोहित शर्माचं काही चालत नाही. रोहित शर्मा त्याच्या धोरणानुसार संघ चालवाया प्रयत्न करतोय. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार गौतम गंभीर जे निर्णय घेईल ते सर्व खेळाडूंना मान्य करावे लागत आहेत. भारताला श्रीलंकेत झालेल्या वनडे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, न्यूझीलंड विरुद्ध भारतानं कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0अशी आघाडी घेतली आहे.भारताला होम ग्राऊंडवर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमवावी लागली आहे. संघाच्या कामगिरीवरुन कॅप्टन आणि कोच आमने सामने आलेत.
रोहित-विराटच्या परफॉर्म्स घसरला
टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंच्या फॉर्मवर आणि कामगिरीवर प्रशिक्षक गौतम गंभीर समाधानी नसल्याची माहिती आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली गौतम गंभीर कोच झाल्यापासून मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरत आहेत. भारतीय संघात तीन गट पडले असल्याची चर्चा आहे. काही खेळाडू रोहित शर्माच्या बाजूनं, काही खेळाडू गौतम गंभीरच्या बाजूनं तर काही खेळाडू आपल्या कामगिरीवर लक्ष देण्याच्या विचारात असल्याने त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.
विराटसोबतही नडला होता गौतम गंभीर?
विराट कोहली आणि लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यातील मैदानावरील वाद झाला होता. ज्यामध्ये सामन्यानंतर गौतम गंभीर देखील सामील होता, हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक होता. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. या सामन्यात विराट कोहलीने नवीन उल हकला अपशब्द वापरले होते. यानंतर सामना संपल्यानंतरही विराट वाद घालताना दिसला, ज्यानंतर एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या खेळाडूंचा समर्थनार्थ हस्तक्षेप केला. यानंतर गंभीर आणि विराट यांच्यात मोठा वाद झाला, त्यामुळे तिघांनाही दंड ठोठावण्यात आला.

ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांच्यात काय होता वाद?
2005 साली भारतीय संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक जॉन राईट यांचा कार्यकाळ संपुष्टात येत होता. नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आणि ग्रेग चॅपेलशिवाय भारतीय संघासाठी दुसरा चांगला प्रशिक्षक नव्हता. भारतीय क्रिकेट बोर्डाने ग्रेग चॅपल यांच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीला मान्यता दिली. कोच ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एक दमदार जोडी सापडल्याचे एकेकाळी वाटत होते, पण ही जोडी फार काळ टिकली नाही. फक्त 2-3 महिन्यांनंतर, झिम्बाब्वे दौऱ्यात, ग्रेग चॅपेल यांनी बीसीसीआयला सौरव गांगुलीबद्दल तक्रार करणारा 3000 शब्दांचा ईमेल लिहिला. बीसीसीआयने ग्रेग चॅपेलच्या ईमेलवर कारवाई करत सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून हटवून द्रविडकडे कर्णधारपद दिले. गांगुली आणि चॅपल यांना त्यांच्या पद्धतीने संघाला पुढे न्यायचे होते, त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्येही अनेक वेळा वाद होऊ लागले. याचाच परिणाम असा झाला की भारतीय संघात सचिन, सेहवाग, गांगुली, धोनी, कुंबळे आणि झहीर खान सारखे दिग्गज दिग्गज असूनही हा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला.

विराट आणि कुंबळे यांच्यात काय होता वाद?
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले की, विराट आणि कुंबळे यांच्यात बराच काळ वाद सुरू होता, विराट कोहलीला असे वाटत होते की अनिल कुंबळे आपल्या खेळाडूंसोबत उभे राहू शकत नाहीत आणि त्याच्या वागण्याने टीममध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणामुळे अनिल कुंबळेला 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
कुंबळे केवळ 1 वर्ष टीम इंडियाचे प्रशिक्षक राहिले. या वादावर रत्नाकर शेट्टी म्हणतात की, अनेकांना कुंबळे प्रशिक्षक म्हणून नापसंत होते आणि त्यांनी प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावे अशी त्यांची इच्छा होती. या प्रकरणाचा खुलासा करताना शेट्टी म्हणाले की, 2017 च्या आयपीएल दरम्यान वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी त्यांची भेट घेतली होती, त्यानंतर वीरूने त्यांना सांगितले की, डॉ. श्रीधर यांनी त्यांना प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर तो अनिल कुंबळे आणि विराट कोहलीसोबत हैदराबादमध्ये सीओएच्या बैठकीत सहभागी झाला होता.












Click it and Unblock the Notifications