मोठी बातमी! विश्वचषक विजेच्या संघाला BCCI देणार पाच कोटी; वाचा, कुणाला मिळणार रोख बक्षिस?

मलेशिया येथे झालेल्या ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाच कोटींचे बक्षिस जाहीर केले आहे. कर्णधार निकी प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. भारतीय महिला संघाचे कौशल्य, संयम आणि वर्चस्वाचे बीसीसीआयने कौतूक केले. टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून विजय मिळवला. या उल्लेखनीय कामगिरीनंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खदीर यांच्या नेतृत्वाखाली विजयी संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

Women s World Cup U-19

खेळाडूंची अलौकीक कामगिरी

या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. जी. त्रिशा 309 धावांसह स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने सात विकेट्स घेतल्यामुळे तिला सामनावीर आणि टूर्नामेंटची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. फिरकीपटू वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला यांनी अनुक्रमे 17 आणि 14 बळी घेत विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.

बिन्नी यांनी केले अभिनंदन

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "U19 महिला विश्वचषक राखल्याबद्दल आमच्या मुलींचे अभिनंदन. ही एक अनुकरणीय मोहीम आहे. ज्यात ते संपूर्णपणे अपराजित राहिले. आम्ही काल रात्री पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या कामगिरीबद्दल बोललो आणि आज त्यांनी आम्हा सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. ही ट्रॉफी भारतातील महिला क्रिकेटच्या शैलीचे प्रतिनिधीत्व करते. टीमचा प्रत्येक सदस्य या स्पर्धेत चमकताना पाहून मला खूप आनंद वाटला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+