महाविकास आघाडीची इतकी बिकट परिस्थिती का?, असं काय घडलं की महायुती पुढे का?
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाला सुरूवात झालेली आहे. सद्या महायुतीतील मित्रपक्षांना चांगल्या जागा मिळत असल्याचा कल दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची परिस्थिती बिकट झालेली आहे.
सद्या महाविकास आघाडीला चांगला कल नसल्यामुळे सत्ताधारी नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू झालेला आहे. तर संजय राऊत यांनी त्याला विरोध केलेला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही असे ते म्हणाले. कारण शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या संभांना ज्या गर्दी दिसत होती. त्यामुळे त्याला काही महत्त्व नाही, असेही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीची इतकी परिस्थिती बिकट का?
महाविकास आघाडीची राज्यातील पहिल्या कलात इतकी वाईट परिस्थिती का आहे, त्याचे कारण म्हणजे महायुती सरकारने केलेली लाडकी बहीण योजनेची घोषणा त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदानासाठी बाहेर पडल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.
विविध आंदोलनाचे मुख्यमंत्र्याचे उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्या पद्धतीने राज्यातील विविध मुद्द्यांना हात घातला गेला त्याला चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ओबीसी-मराठा आंदोलनाबाबत महायुतीच्या नेत्यांना चांगली भूमिका घेतली. त्यामुळे मराठा व ओबीसी मतदान हे महायुतीच्या पाठीशी उभे राहिले असल्याचा बोलले जात आहे.
सद्या कोण आघाडीवर...
मिळालेल्या माहितीनुसार, महायुती 225 जागांसह आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 57 जागांवर आघाडीवर आहेत. तर 6 अपक्षांना आघाडी मिळाली आहे. महायुतीत भाजपा आघाडीवर आहे. भाजपा 110 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गट 41 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी गट 33 जागांवर आघाडीवर आहे.












Click it and Unblock the Notifications