एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला का हवे गृहमंत्रीपद? संजय राऊतांनी सांगितले 'हे' मोठे कारण! दावा अन् आरोप
Sanjay Raut on Eknath Shinde : "एका गृहमंत्रीपदावरुन शपथविधी लटकलेला नाही. फक्त गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमागे असू शकत नाही. भाजपने अनेक राज्यात सरकार बनवली आहे पण प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन मुख्यमंत्री आणले आहेत त्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे." असे वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्री पद का हवे याचे कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी सांगत काही आरोपही केले आहेत.
हे कसले मजबूत नेते -राऊत
संजय राऊत म्हणाले, मला कळत नाही की, भाजप जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. नरेंद्र मोदींसारखा, अमित शहांसारखा मजबूत नेता, देवेंद्र फडणवीस वगैरे-वगैरे एका गृहमंत्रीपदावरुन महाराष्ट्र राज्याचे सरकार अधांतरी लटकून पडले आहे. मग हे कसले मजबूत नेते.त्यांच्याकडे बहुमत आहे. अजित पवार एकनाथ शिंदेंचे लोक आहेत पुढे काय करतील माहित नाही पण आता बहुमत असताना ते राज्याला सरकार देत नाही. राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा करायला अद्याप तयार नाही.

राज्यपालाकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही आणि थेट मांडव घालता. एका गृहमंत्री पदावरुन हे थांबलेले नाही. भाजपने मनात जरी आणले आणि समोरचे ज्या मागण्या करत आहेत त्या मागण्या एका मिनिटांत उडवून देऊ शकतात. इडी, सीबीआयला घाबरुन पळालेले लोक आहेत ते स्वबळावर निवडून आलेले नाही ते कसे निवडून आले हे कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहीत आहे. त्यांना जनमताचा पाठींबा नाही.
संजय राऊत म्हणाले, एका गृहमंत्रीपदावरुन शपथविधी लटकलेला नाही. फक्त गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमागे असू शकत नाही. भाजपने अनेक राज्यात सरकार बनवली आहे पण प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन मुख्यमंत्री आणले आहेत त्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे. फडणवीसांच्या जागी कुणाला आणले जात आहे का त्यासाठी सत्ता स्थापन करणे थांबले का याचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला हवा नाहीतर आम्ही जे आमचे पुस्तक बंद आहे ते उघडू.
राऊतांनी सांगितले शिंदेंना का हवे गृहमंत्रीपद
संजय राऊत म्हणाले, शिंदेसेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवे आहे की, त्यांना पोलिसांचे सलाम हवे आहेत. पोलिस यंत्रणा वापरुन खोटे गुन्हे दाखल केले. दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. ही यंत्रणा त्यांच्या हाती असावी हे त्यांना वाटते. याच यंत्रणेचा भविष्यात वापर करुन ते भाजपच्या अंगावरही जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आणि विकृती आहे. पण मुख्यमंत्री गृहखाते स्वतःकडे ठेवतो, देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वी ते ठेवलेले आहे. संजय राऊत म्हणाले, गृहमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद हे संवेदनशील विषय होते त्यामुळे आमचे सरकार पडले नाहीतर पडले नसते.
रावसाहेब दानवेंचा राऊतांकडून समाचार
संजय राऊतांनी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील या रावसाहेब दानवेच्या वक्तव्यावर समाचार घेतला.
रावसाहेब दानवे कोणत्या विषयावर उड्या मारतील हे सांगता येत नाही. आम्ही त्यांच्याबरोबर होतो तेव्हा त्यांना आम्ही नकोसे झालो. तेव्हा अमित शहांना त्यांनी जो शब्द दिला तो पाळा हे सांगितले नाही. तेव्हा त्यांची तोंड का शिवली होती, असा सवालही त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications