फडणवीसच मुख्यमंत्री का होऊ शकतात, प्रमुख 5 कारणं, ज्यामुळे महायुतीचे मित्रपक्षही गप्प झालेत?
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप प्रणित महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा सद्या सुरू आहे. पण अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री सहज होऊ शकतो. आजवर त्यांचे ब्राह्मण असणे हे त्यांचे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होते. याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्येही त्यांच्यावरुन मतभेद होते. पण, या विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कामं याला कोणालाही नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यात त्यांची मोठी बाजू पक्की झाली आहे. त्यामुळे भाजपपुढे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.
चला तर जाणून घेऊया, फडणवीस यांनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का केले जाणार, त्यासंबंधातील प्रमुख 5 मुद्दे समजून घेऊया...!
सेना,NCP फोडण्यात मोठा वाटा
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे चाणक्य म्हणून उदयास आले तर वावगं ठरणार नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी कथित गद्दारी करत मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला. त्यानंतर फडणवीस यांनी शरद पवारांसारख्या बलाढ्य राजकारण्याच्या जबड्यातून अजित पवारांसारख्या नेत्यांना खेचून आणले. पण त्यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्यासोबत आणता आले नाही. त्यामुळे त्यांचा खेळ अवघ्या 80 तासांतच संपला.
देवेंद्र फडणवीस यांचे हे पहाटेचे औटघटकेचे सरकार पडले. पण फडणवीस यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. त्यामुळे भाजपला त्यांच्या जोरावरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पाडता आली. या फुटीमुळे देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी ठरले. पण, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

जरांगे, ठाकरेंच्या टीकेचे धनी बनले
उद्धव ठाकरेंपासून मनोज जरांगेंपर्यंत सर्वांनी फडणवीस यांना त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी देण्यात आली. शरद पवारांनी तर कथितपणे त्यांची जातच काढली. पण त्यानंतरही देवेंद्र फडणवीस डगमगले नाहीत. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपचा वारू पुढे नेण्याचे काम केले. त्यानंतर आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणून दाखवण्याचा करिश्माही करून दाखवला.
2) बिहार व MP मॉडेल महाराष्ट्रात नाही चालणार
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी बिहार मॉडेलचा युक्तिवाद केला जात आहे. बिहारमध्ये जदयुला कमी जागा असतानाही भाजपने तिथे नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. विशेषतः फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे मागासवर्गीयांचे राजकारण लक्षात घेता मध्य प्रदेशाच्या धरतीवर एखाद्या फारशा चर्चेत नसणाऱ्या ओबीसी नेत्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचाही आग्रह धरला जात आहे. भाजपने गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात हा प्रयोग केला. पण महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे.
महायुतीतील सर्व सूत्रे फडणवीसांच्या हाती
महाराष्ट्रात 6 पक्षांनी निवडणूक लढवली. त्यात 3 पक्षांना बहुमत मिळाले. त्यापैकी एखादा पक्ष नाराज झाला तर नवे समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे हे भाजपला चांगलेच ठावूक आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाला येथे सोशल इंजिनिअरिंग विसरून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागेल अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्याकडेच महायुतीमधील सर्व पक्षांची सूत्रे आहेत. एवढेच नाही तर साम दाम दंड भेद वापरून सरकार चालवण्याची ताकद त्यांच्या अंगी आहे.
3) विधानसभेत सर्वाधिक मेहनत घेतली
भाजपच्या नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांची उंची व लोकप्रियतेची जाणीव होती. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अधिकाधिक रॅली आणि प्रचार सभा घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यांच्या ब्राह्मण असण्याने किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर मतदार चिडले असते तर कदाचित त्यांना पक्षाचा मुख्य चेहरा बनवून बढतीची बक्षीशी दिली गेली नसती.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांहून जास्त सभा व रॅली घेतल्या. साहजिकच या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना बाजूला सारून एखाद्या नव्या नेत्याला मुख्यमंत्री केले तर पक्षांतर्गत असंतोष वाढण्याची भीती आहे.
4) संघ व भाजपचा चेहरा
लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर देंवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केली होती. ही एक मोठी घटना होती.
संघाचा प्रचंड विश्वास
संघ अशा पद्धतीने कुणाचीही बाजू घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाही. फडणवीस यांच्या यांच्या घरी संघ व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यासंबंधीची बैठक झाली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी बाहेर येऊन पक्षाने फडणवीस यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचे सांगितले होते.
मोदी-शहांचे विश्वासू
उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनपेक्षित विजयात संघाचाही महत्त्वाचा वाटा होता, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. संघावर प्रत्येक वेळी विश्वास व्यक्त करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. यासोबतच देवेंद्र फडणवीस हेच ते नेते आहेत, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही विश्वास आहे.
5) प्रशासक अन् संघटक अशी ओळख
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक राजधानी आहे. देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के महसूल या एकट्या राज्यातून येतो. आजही देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक याच राज्यात येते. यंदाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण व्हायचा आहे. याशिवाय 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा मार्गही महाराष्ट्रातून जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला मुख्यमंत्री करणे ही भाजपची मजबुरी आहे.
-
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
India Post GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; 'असा' तपासा तुमचा निकाल! -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग










Click it and Unblock the Notifications