Panjabrao Deshmukh:अमरावती विमानतळाला पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची चर्चा! वाचा त्यांच्याविषयी
Who is Panjabrao Deshmukh : अमरावती येथील विमानतळाचे 25 एप्रिल 2025 रोजी बुधवारी उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले. अमरावती विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा आता सुरू झाली आहे. विदर्भातील हा भाग आता हवाई संपर्काने जोडला गेला आहे. बेलोरा येथील हे विमानतळ शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे, आज सकाळी 11:30 वाजता पहिले व्यावसायिक विमान मुंबईकडे रवाना झालं. या नवीन विमानसेवेमुळे प्रवासी आणि व्यापारासाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.
या विमानतळाच्या नावावरुन मोठ्या प्रमाणात संभ्रम होता, आधी पंजाबराव देशमुख यांच्या नावाची चर्चा, नंतर प्रज्ञाचश्रू गुलाबराव महाराज विमानतळअसं नाव आणि नंतर अमरावती विमानतळ यात नेमकं नाव काय हे सरकार ठरवेल पण तूर्त अमरावती जिल्ह्याचे सुपूत्र असलेले पंजाबराव देशमुख कोण आहेत, त्यांचे राजकीय योगदान, जीवनकार्य याबद्दल जाणून घेऊया.

पंजाबराव देशमुख यांच्याविषयी ..
पंजाबराव देशमुख यांचा जन्म
अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी 27 डिसेंबर 1898 रोजी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. 1936 च्या निवडणुकीनंतर ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते.
शिक्षणासाठी भरीव कार्य
तसे पाहता त्याकाळात विदर्भ मागास समजला जात होता. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहे.
पंजाबराव देशमुख यांचे ब्रीद वाक्य
पंजाब राव देशमुख तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व आणि साऱ्या विदर्भाची शान होते. 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते. ते सर्वधर्म समभावाचे पुरस्कर्ते होते.
पंजाबराव देशमुख यांचे राजकीय जीवन
पंजाबराव देशमुख तत्वनिष्ठ राजकारणीही होते, शिक्षणाबरोबरच राजकारण कसे असावे, त्यात लोककल्याण कसे करता येते हे त्यांनी दाखवून दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते पहिल्यांदा 1952 खासदार झाले. 1952 ते 1962 या काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. भारताचे पहिले कृषिमंत्री ते होते. त्यानंतर 1957 आणि 1962 असे तीन वेळा लोकसभेत ते गेले होते.देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने 1932 मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले होते.
पंजाबराव देशमुख यांचे कार्य
- 1927- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
- वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
- 1933 - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
- 1926 - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
- 1927 - शेतकरी संघाची स्थापना.
- 1932 - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. तसेच ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
- 1950 - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.
- 1955 - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
- 1956 - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
- 18 ऑगस्ट 1928 - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
- 1930 - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
- प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.












Click it and Unblock the Notifications