Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या बिश्नोई गँगचा काय आहे इतिहास, वाचा सविस्तर

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घटनेच्या 28 तासांनंतर सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स गँगने अभिनेता सलमान खानला तुझ्यामुळे अनुज थापनचे नुकसान झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बिश्नोई गँग चर्चेत आली आहे. पण हा लॉरेन्स बिश्नोई कोण आहे. ही बिश्नोई गँग कोण आहे, या गँगचा नेमका उद्देश काय आहे, चला तर जाणून घेऊया या गॅगविषयी...!

बाबांना तीन गोळ्या लागल्या...!

वांद्रे येथील खेर नगर येथील आमदार पुत्र जीशान यांच्या कार्यालयाबाहेर काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सिद्दीकी यांच्यावर 3 हल्लेखोरांनी गोळीबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमध्ये आलेल्या 3 शूटर्सनी दोन बंदुकांमधून 6 राऊंड फायर केले. बाबांना तीन गोळ्या लागल्या. त्याच्या पोटात 2 आणि छातीवर 1 गोळी लागली. तिघांनी तोंडाला रुमाल बांधले होते.

lawrence bishnoi

सिद्दीकीला वाय-सुरक्षा मिळाली होती, पण त्याच्यासोबत एकही हवालदार नव्हता. पथदिवे आणि सीसीटीव्हीही बंद होते. दुसऱ्या शूटरला अटक करण्यात आली आहे, तर तिसऱ्या शूटरचीही ओळख पटली आहे. अनेक राज्यात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या 40 दिवसांपासून मुंबईत राहून शूटर सिद्दिकी यांचे घर आणि मुलाचे कार्यालयावर माग ठेवत होते.

सुरुवातीपासूनच या घटनेमागे गँगस्टर लॉरेन्स गँगचा हात असल्याचा संशय होता. लॉरेन्स गँगचे नाव समोर आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. लॉरेन्स गँगने 14 एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

पंजाबमधील फिरोजपूर 12 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला. लॉरेन्सचे वडील 1992 मध्ये हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. मात्र पाच वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी शेती सुरू केली. लॉरेन्सने पंजाब विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आहे. 2009 मध्ये शिक्षणादरम्यान तो पंजाब विद्यापीठाच्या एका विद्यार्थी संघटनेत सामील झाला. त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गोल्डी ब्रार याच्याशी भेट झाली.

गोल्डीला भेटल्यानंतर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात सामील झाल्यानंतर बिष्णोईची पावले गुन्हेगारीच्या जगाकडे वळला. तो बेकायदेशीर कामात अडकू लागला. जवळपास दोन दशकांनंतर, लॉरेन्स बिश्नोई हा एक गुन्हेगारी जगतातला चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला.

लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्था आणि दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लॉरेन्स सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक 8 मधील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये कैद आहे. लॉरेन्स बिश्नोईवर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत.

बिश्नोई गॅंगच्या काही खास गोष्टी?

लॉरेन्स बिश्नोई टोळी देशातील सर्वात मोठी टोळी बनली आहे. या टोळीत 600 शूटर्स आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे जाळे देशभर पसरले आहे. या टोळीचे गुंड पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहेत.ही टोळी कॅनडा आणि दुबईतूनही कार्यरत आहे.लॉरेन्स बिश्नोई टोळीची बंबीहा गँगशी स्पर्धा आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीचे तीन साथीदार, रोहित गोदारा, संपत नेहरा आणि वीरेंद्र चरण हे गुन्हे नियोजन, पैशाचा हिशेब आणि शस्त्रास्त्रे पुरवण्याची जबाबदारी सांभाळतात.सुखदेव सिंग गोगामेडी हत्याकांडातही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे बोलले जाते.लॉरेन्स बिश्नोईवर सलमान खानवर दोनदा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोईवर सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचाही आरोप आहे.

कशी चालते ही लॉरेन्स बिश्नोई गँग?

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आला आहे. पण त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की तो तुरुंगात असो की बाहेर याने त्याला फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ असा की, तुरुंगात बसून तो अगदी सहजतेने वाटेल ते करतो. तुरुंगात बसून तो आपल्या शत्रूंच्या नावे कंत्राटे घेतो आणि तुरुंगात बसून करोडो रुपये वसूल करतो. एनआयएच्या चौकशीदरम्यान, त्याने त्याच्या कामाची संपूर्ण मोडस ऑपरेंडी आणि त्यातील प्रत्येक सत्य उघड केले होते.

सलमानच्या जीवावर का उठली बिश्नोई गॅंग?

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. यापूर्वी सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गँगस्टर गोल्डी बराडने धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँग सलमान खानच्या जीवावर का उठली आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. चला त्यावर देखील सविस्तर जाणून घ्या. मुळात गेल्या महिन्यात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांना जाहीरपणे धमकावल्याची घटना समोर आली आहे. 19 सप्टेंबर बुधवारी सकाळी सलीम खान बँडस्टँडमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना ही घटना घडली. त्याच दरम्यान स्कूटरवरून एक तरुण आणि बुरखा घातलेली एक महिला तेथे आली आणि सलीम खान यांना विचारले की लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का?

काळवीट आणि बिश्नोई समाज

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा आहे. हा समाज राजस्थानमधल्या जोधपूरजवळच्या थार वाळवंटाशी संबंधीत आहे. हा समाज नैसर्गिक गोष्टींवर प्रेम करणारा आहे, विशेष म्हणजे प्राण्यांना हा समाज देव मानतो. त्यातही हरिण हा प्राणी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काळवीटाची ते पूजा करतात. त्यामुळेच हरणाच्या रक्षणासाठी हा समाज आपल्या जीवाचीही बाजी लावताना दिसतो. राजस्थानमधल्या काही गावात तर महिला हरिणाच्या बछड्यांना आपलं दूध पाजतात.

बिश्नोई समाजाचे नियम

प्राण्यांचं रक्षण करताना मृत्यू आल्यास बिश्नोई समाजात त्या व्यक्तीला शहीदांचा दर्जा दिला जातो. प्राण्यांच रक्षण करणं, हिरवीगार झाडं न तोडणं असे काही नियम या समाजाने आखले आहेत. त्यातली काळविटाला या समाजात देवाचं स्थान आहे. जोधपुरच्या राजाने झाडं कापण्याचा आदेश दिल्यानंतर बिश्नोई समाजाने झाडांना मिठी मारत आंदोलन केलं होतं. यात जवळपास 363 बिश्नोई समाजातील लोकांचा मृत्यू झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+