What is Makoka : मकोका म्हणजे काय, वाल्मिक कराडला Makoka का लावला गेला, कारवाई अन् शिक्षा काय?
What is makoka, how makoka is charged : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला संशयित आरोपी म्हणून पोलिसांकडून धरले जात आहे. तर आज कोर्टाकडून कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानतंर सीआयडीने मकोका लावण्याचा अर्ज दाखल केला. त्यानंतर मकोका कोर्टाने वाल्मिक कराडला मकोका लावला.
त्यामुळे सीआयडी मकोकाअंतर्गत नव्याने कोठडी मागणार आहे. त्यानंतर उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती समोर आलेली आहे. दरम्यान, मकोका का लावला जातो. नेमकं मकोका म्हणजे काय असते. मकोका कायदा काय असतो, अशा प्रश्न उपस्थित होत आहे, चला तर जाणून घेऊया, मकोका कायद्याविषयी सर्व काही...!

मकोका कायदा कधी निर्माण झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 'टाडा' या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच 'मकोका' कायदा बनवलेला आहे. मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.
मकोका कधी लावला जातो?
गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मकोका अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
मकोका कारवाई नेमकी कोणावर होते?
- हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो.
- मकोका लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो.
- तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते.
- या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.
मकोका लावण्याची नेमकी प्रक्रिया कशी असते?
- मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मकोकाअंतर्गत कारवाई होऊ शकते.
- त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार, आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.
मकोका लागल्यावर शिक्षा काय मिळते?
- मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहज मिळवता येत नाही. भारतीय दंड संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते.
- त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे.
- संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मकोकाची तरतूद केली आहे.












Click it and Unblock the Notifications